Thursday , December 8 2022
Breaking News

कुणबी पाटील पंच मंडळाने केला रितेशचा सत्कार

भिकन अण्णांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण कर — माधवराव पाटील

विकास पाटील जिल्हा विभागीय संपादक जळगांव सुराज्य न्यूज महाराष्ट्र 

धरणगाव (१५ नोव्हेंबर २०२२) — येथील कुणबी पाटील पंच मंडळ लहान माळी वाडा यांच्या वतीने रितेश भिकन पाटील याचा शाल आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. होमगार्ड समादेशक कार्यालय नंदुरबार येथे कनिष्ठ लिपिक पदावर रुजू होणारा रितेश कै. भिकन जगन्नाथ पाटील (सामग्री प्रबंधक सुभेदार, संभाजीनगर) यांचा चिरंजीव आहे.
या सत्कार प्रसंगी समाजाचे जेष्ठ सदस्य माधवराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना रितेशला सांगितले की, भिकन अण्णांचे अपूर्ण स्वप्न तुझ्या माध्यमातून पूर्ण झाले पाहिजे. अण्णांनी ज्या पद्धतीने नावलौकिक मिळविला अगदी त्याच पद्धतीने तु देखील कार्य कर हिच त्यांना आदरांजली ठरेल अशा भावना माधवराव पाटील यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमात समाधान पाटील याचा देखील वाढदिवसाच्या निमित्ताने गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुणबी पाटील पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष आणि रितेशचे काका दिलीपबापू पाटील, सचिव महेश्वर पाटील, सहसचिव दिनेश पाटील, खजिनदार लक्ष्मणराव पाटील, सदस्य कैलास पाटील, दत्तू पाटील, राजेंद्र पाटील, गणेश पाटील, वाल्मिक पाटील, परशुराम पाटील, जेष्ठ संचालक भगवान पाटील, रविंद्र पाटील, बाळू पाटील, पंकज पाटील, राहुल पाटील, भूषण पाटील, गोपाल पाटील, जयेश महाजन, सुमित महाजन, दिपक पाटील, रामचंद्र मराठे, समाधान पाटील आदी समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: