Thursday , December 8 2022
Breaking News

कणकोरी संस्थेची बिनविरोध निवडीची परपंरा खंडित….

 

सुराज्य न्युज / सुरेश सांगळे

कनकोरी :- कणकोरी संस्थेची बिनविरोध निवडीची परपंरा खंडित. निवडणुक 11 जागांसाठी, उमेदवार-18….तालुक्यातील कणकोरी येथील विकास संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत 11 जागांसाठी 18 उमेदवार रिंगणात आहेत.दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. विकास संस्था स्थापन झाल्यापासून निवडणुक बिनविरोध होत होती. मात्र या वेळेस दोन्ही गटात एकमत न झाल्याने ,परपंरा खंडित झाली असून प्रथमच निवडणुक प्रक्रिया होत आहे. विकास संस्थेच्या 13 जागांसाठी 36 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 8 जनांनी माघार घेतल्याने 11 जागांसाठी 18 उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. भटक्या विमुक्त जाती/जमातीच्या एका जागेसाठी 3 उमेदवारी अर्ज दाखल होते. श्री. मारुती साबळे व श्री. गणेश दत्तू सांगळे. यांनी माघार घेतल्याने संस्थेचे अध्यक्ष, श्री. दगू मुरलीधर सांगळे. यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

तर अनुसूचित जाती/जमाती गटातून ,श्री. भिका शिवराम आहिरे, यांनी माघार घेतल्याने, श्री. दिपक दादू आहिरे यांची वर्णी लागली आहे. तर सर्व साधारण गटाच्या 8 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत.यामध्ये आण्णा उगले. सोपान कवडे, मधुकर जगताप, नानासाहेब जगताप, भाऊ बुचकूल, सुरेश बुचकूल, आण्णासाहेब सांगळे, तुकाराम सांगळे, मंडलिक सांगळे, गोरख सांगळे, मारुती साबळे, एकनाथ सावंत, यांच्यात लढत होत आहे. तर महिला राखीव गटाच्या दोन जागांसाठी ,निर्मलाबाई बुचकूल, अंजना सांगळे, जाईबाई सांगळे, हिराबाई सांगळे, यांच्यात दुरंगी लढत होत आहे. तर इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी, माजी सरपंच,निलेश जगताप व सोमनाथ खांडगे यांच्यात लढत होत आहे.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: