Thursday , December 8 2022
Breaking News

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्र्याच्या.मा.सौ.डाॅ. खा.भारती ताई पवार घेतली भेट

सुराज्य न्युज /अमोल बच्छाव

मालेगाव :- केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री मा.श्री. पियुष जी गोयल यांची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खा.डॉ. भारती प्रविण पवार यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात यंदा मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली असून उत्पादन मोठ्या प्रमाणात अपेक्षीत असल्याबाबत अवगत केले.
तसेच कांदा लागवडीचा खर्च बघता,कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव असून कांदा हे हुकमी व नगदी पिक असल्यामुळे शेतकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कांदयाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात याचीही डॉ. भारती पवार यांनी परिस्थिती मांडली.
तसेच गत दोन वर्षात आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सतत आपल्या माध्यमातून मदत देत आहेत याबाबत आभार व्यक्त केले.
यावेळी मा. मंत्री पियुष जी गोयल यांनी केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे व राहील अशी ग्वाही नामदार डॉ. भारती पवार यांना दिली. विद्यामान मालेगाव पंचायत समीती सदस्य मा.श्री.अरूण दादा माऊली यांनी आभार व्यक्त केले

About नितीन लांडगे संपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: