Sunday , November 27 2022
Breaking News

येवली ते शेटेवाडी वाळकी बाजार रस्त्यामधील पूल गेला वाहून..

गजानन जिदेवार तालुका विशेष प्रतिनिधी हदगाव जि.नांदेड

हदगाव : हदगाव तालुक्यातील येवली ते शेटेवाडी वाळकी बाजार रस्त्यामधील नालीवरील फुल आजच्या पडलेल्या पावसामुळे दिनांक २/ ७ /२०२२ रोज शनिवार वाहून गेला आहे मागील दोन वर्षापासून सतत शेतकऱ्यांच्या लोकवणीतून या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती परंतु फार कमी शेतकऱ्यांची लोकवर्गणी होत असल्याकारणाने शेतकऱ्यांना पुरेशे त्यासाठी पैसे जमत नसल्याने सलग दोन वर्षापासून हा पूल वाहून जात आहे तरी याची शासनाने दखल घेऊन योग्य ती शासनामार्फत शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी शेतमजुरांसाठी शेतीमधील पेरणी शेतातील कामे करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा रस असा रस्ता असल्याकारणाने येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची फार वाईट अवस्था झाली आहे आजच्या पाऊस पेरणी योग्य झाला असून पेरणीसाठी जाण्यासाठी शेतकऱ्यांचे वाहने बैलगाडी शेतमजूर यांना अत्यंत त्रासदायक हा असा रस्ता बनला आहे तरी शासनाने योग्य ती शासनामार्फत मदत करून देऊन हा रस्ता सुरळीत चालू करण्यात यावा अशी गावकऱ्यांच्या वतीने मागणी आहे..

About किरण सोनवणे

Check Also

आदिवासी विरांगणा झलकारीबाई

रविंद्र वसावे विशेष प्रतिनिधी नंदुरबार सुराज्य न्यूज महाराष्ट्र नंदुरबार (२३ नोव्हेंबर २०२२) : आदिवासी विरांगणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: