Thursday , December 8 2022
Breaking News

जिल्हाअधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल विविध संघटनांकडून गौरव

सुराज्य न्युज/ रुपाली मेश्राम

भंडाराः भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदिप कदम (भाप्रसे) व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव (भापोसे) यांनी अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळून भंडारा जिल्ह्याचे नाव भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासनाचे यशस्वी कार्यकुशलतेचे परिमाण प्राप्त केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भंडारा जिल्ह्यातील अग्रगण्य विविध सामाजिक संघटनांनी त्यांना भारतीय संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे संयुक्तीक छायाचित्र व सन्मानपत्र स्मृतीचिन्हांच्या रूपात प्रदान करून गौरविण्यात आले.
सन्मान समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व्यासंग व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा आदर्श जोपासला तर महान देशाची निर्मिती होऊ शकते. स्मृतिचिन्हांच्या स्वरूपात दोन महान विभूतींचे संयुक्त छायाचित्र मला प्रदान केल्यामुळे मला अत्यानंद झाला. मी जनतादक्ष राहून तत्परतेने कार्य करीतच राहीन’ असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजीमहाराज दोन महान विभूतींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक संघटनांच्या सहकार्याने
व संविधानाच्या मार्गदर्शनाने समस्त जनतेच्या हितासाठी मी सदैव तत्पर राहीन. सामाजिक संघटनांकडून आज झालेला माझा सन्मान माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण राहील’ असे प्रशंसनीय उद्गार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
मागील दिड वर्षापासून जिल्हाधिकारी म्हणून सामान्य लोकांच्या हितासाठी व जिल्ह्याच्या संगिन विकासासाठी उत्कृष्ट कार्य करीत असुन अत्यंत कुशल व कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख आहे. निवडणूक कार्य, शिक्षण विषयक कार्य, वैनगंगा पूर सदृश्य परिस्थिती व कठीण कोरोणा सारखी परिस्थिती अत्यंत कुशलतेने हाताळून महाराष्ट्र राज्यात भंडारा जिल्ह्याला कोविड लसीकरणात प्रथम स्थान प्राप्त करून दिले. त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मिळालेल्या सन्मानामुळे महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्याला एक गौरव प्राप्त झालेला आहे.

त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यात वसंत जाधव (भापोसे) हे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्य करताना जिल्ह्यात फोफावलेले अवैध व्यवसाय, जुगार, मटका, वाढती व्यसनाधीनता, वाढती गुन्हेगारी, अवास्तव रहदारी तसेच समाज विघातक कृत्य यांवर प्रतिबंध घालण्याचा सदोदित प्रयन्न केला व करीतच आहेत. सामान्य लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी भंडारा जिल्ह्यात फिरते पथक, मार्शल पथक, पोलीस आपल्या दारी अशी नवनवीन योजना राबवून सामान्यांच्या मनात पोलीस
विभागाविषयी आदराची भावना निर्माण केली. कोरोना सद्रुश्य परिस्थितीत व वैनगंगा पुर परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अतिशय योग्य प्रकारे हाताळली. त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल गुणवत्तापूर्ण राष्ट्रपती पोलीस पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच भारत सरकार कडून भा.पो.से. प्रदान करुन गौरविण्यात आले.जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्या अतुलनीय कार्याचा व उत्तम नियोजनाने भंडारा जिल्हावासियांना सार्थ अभिमान आहे. त्याच्या अतुलनीय कार्याच्या व उत्तम नियोजनाच्या गौरवार्थ केंद्रीय मानवाधिकार संघटन नई दिल्ली, संयुक्त लोकशाही आघाडी, दलित पॅथर संगठना, प्रेस संपादक/पत्रकार सेवासंघ महाराष्ट्र, म.रा. कास्ट्राईब कर्म.कल्याण महासंघ पुणे,डॉ. बाबा साहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद या सामाजिक संघटनांतर्फे सन्मानपत्र अत्यंत हृदयस्थ बहाल करून सन्मानित करण्यात आले. व पुढील प्रशासकीय वाटचालीस अनंत शुभेच्छा देण्यात आल्या.
सन्मानित करतांना केंद्रीय मानवाधिकार संघटन नई दिल्ली चे महाराष्ट्र राज्य प्रभारी डॉ. देवानंद नंदागवळी, संयुक्त लोकशाही आघाडीचे निमंत्रक अचल मेश्राम, अखिल भारतीय मराठी साहित्य
परिषद चे नाशिक चवरे, प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघ महाराष्ट्र राज्य चे विदर्भ सरचिटणीस शेखर बोरकर, महाराष्ट्र लाईव्ह न्युज चे संपादक शशिकांत भोयर, म.रा. कास्ट्राईब कल्याण महासंघ पुणे चे राज्य उपमहासचिव सूर्यभान हुमणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चे विभागीय अध्यक्ष प्रा. शीलवंतकुमार मडामे, दलित पँथरचे राज्य उपाध्यक्ष संजय लुटे, दलित पँथरचे राज्य जिल्हा अध्यक्ष राहुल वानखेडे , महेंद्र तिरपूडे, प्रा. अनमोल देशपांडे, विनय सुदामे, हरिश्चंद्र धांडेकर, रमेश यावलकर, यशवंत नंदेश्वर, रंजुताई बांगर, हेमाताई गजभीये, सैनपाल वासनिक, पुरुषोत्तम तांबे मुख्याध्यापक, शशिकांत देशपांडे, ताराचंद नंदागवळी, संघदिप डोंगरे आदिची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शीलवंतकुमार मडामे यांनी केले तर आभार प्रदर्शन शशिकांत भोयर यांनी केले.

About जगन जाधव

Check Also

मुरमाडी/तूप येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे

माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांनी मागणी कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: