Thursday , December 8 2022
Breaking News

निरोप समारंभ एका आदर्श शिक्षकांचा मा.श्री.एस.एस.तितरमारे

संघरत्न उके कुही तालुका प्रतिनिधी जिल्हा नागपूर मो 9764421627

कुही:- दिनांक 30 जुन 2022 ला नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील नवेगाव (चिचघाट)पुनर्वसन क्र.3 येथील मुकुंदराज स्वामी माध्यमिक विद्यालय नवेगाव(चिचघाट) येथील आदर्श शिक्षक मा.श्री.एस. एस.तितरमारे सर हे दि.1जुलै 1994 ला रुजू झालेत.व आज दिनांक 30जुन 2022 ला 28 वर्ष पूर्ण शिक्षकीपेशाची सेवा झाली. 11 वाजता सेवानिवृत्त शिक्षक सुरेश श्रावण तितरमारे यांच्या जाहीर निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.त्या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या फोटो ला दिपप्रज्वलन,अगरबत्ती, मेनबत्ती,फुलांची माळ घालून करण्यात आली. मंगलमय कार्यक्रमाला सुरुवात केलीत. कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादास तितरमारे संस्थापक अध्यक्ष हे होते.तर प्रमुख पाहुणे अरुण जिवतु हटवार जिल्हा परिषद सदस्य राजोला सर्कल,टिनु शेंडे सरपंचा बोरी नाईक गट ग्राम पंचायत,धनराज पडोळे सरपंच हरदोली नाईक, नितेश कारेमोरे उपसरपंच,माजी विद्यार्थी संघरत्न उके-शिक्षक, सेवक चिमुरकर,माजी शिक्षक दयाराम डहारे,सुनिल डोंगरवार,दामोधर चिमुरकर, भिमराव शेंडे,आयुष उके,हे होते. दुपारी 4 वाजता सेवानिवृत्त झाले.व निरोप समारंभाच्या निमित्ताने बरेच नागरीक,विद्यार्थी पाहुणे मंडळी उपस्थित होते.अनेक विद्यार्थ्यांना वर्ग 10 वी व 12 वी मध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. व एस एस तितरमारे सरांनी मुलांना मार्गदर्शन केलेत.कारण अत्यंत बिकट परिस्थितीत बदल घडवून आणले व स्वतः ऊन वारा पाऊस सहन करुन मुलांना एक विद्यमान डॉक्टर केले.सरांची परीस्थिती वाईट असतानीही परीस्थिती वर मात करून द्यावेत. अशी सुंदर सुचना दिली आहे.व त्यांनी सांगितले की,”आपला आपण करावया विचार तरावया पार भवसिंधु”. पाहुणे मंडळीना जेवणाची व्यवस्था करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक मनोज तितरमारे, सहायक शिक्षक,शिक्षीका,शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते. सरांना निरोप घेताना अनेक मुलेमुली ढोल ताशा पथक वाजवित नवेगाव,हरदोली (म्हसली)पुनर्वसन गावातुन मिरवणूक काढण्यात आली.

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: