Saturday , December 3 2022
Breaking News

स्काॅच पुरस्काराने गौरव, स्काॅच पुरस्कार मिळणारे ठाणे शहर हे राज्यातील एकमेव शहर

सौ.मनिषा मसुरकर विशेष प्रतिनिधी ठाणे शहर जिल्हा ठाणे
मो.नं. ९७६९९१६८६५

ठाणे : ठाणे इंडिया गव्हर्नन्स फोरमच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये “स्काॅच स्टेट आॅफ गव्हर्नन्स रिपोर्ट – २०२१” या श्रेणीत ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली असून स्टार आॅफ गव्हर्नन्स स्काॅच अवाॅर्ड इन “म्युनिसिपल गव्हर्नन्स” राष्ट्रीय पुरस्काराने ठाणे महापालिकेस गौरविण्यात आले.

दिल्ली येथे संपन्न झालेल्या विशेष समारंभात महापालिका आयुक्त डाॅ.विपिन शर्मा यांच्यावतीने स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्काॅच पुरस्कार मिळणारे महाराष्ट्रातील ठाणे हे एकमेव शहर ठरले.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक मध्ये खासदार भव्य रोजगार मेळावा.

सुराज्य न्युज /अमोल चव्हाण https://forms.gle/rTFcVjCEbjoVThix9 नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री.हेमंत जी गोडसे साहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: