Thursday , December 8 2022
Breaking News

इनरव्हिल डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी गिरिषा ठाकरे.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- मालेगाव शहराला रोटरीची समृद्ध परंपरा आहे. गेल्या सत्तर वर्षापासून आंतरराष्ट्रीय रोटरी संस्था कार्यरत आहे. याच रोटरीच्या माध्यमातून महिलांसाठी इनरव्हील क्लब असतो. अशा इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी गिरीषा ठाकरे यांची निवड झाली. चाळीसगाव येथे झालेल्या भव्य पदग्रहण समारंभात मांदियाळी या उत्सवात रोटरीचे प्रांतपाल डॉ आनंद झुनझुनवाला, इनरव्हील असोसिएट माजी अध्यक्षा रश्मी शर्मा यांच्या उप स्थितीत मावळत्या चेअरमन अश्विनी गुजराथी यांच्या कडून पदभार स्वीकारला. नाशिक ते नागपूर पर्यंतच्या सहा महसूल जिल्ह्यांचा एक डिस्ट्रिक्ट असतो. यामध्ये ५५ इनर व्हील क्लब समाविष्ट आहेत.

मुळच्या खाकुर्डी येथील असलेल्या ठाकरे गेली अनेक वर्षांपासून इनरव्हील मालेगावचे काम करतात. अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडली. येथील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट, रोटरीचे उप प्रांतपाल दिलीप ठाकरे यांच्या पत्नी आहेत. यंदाच्या असोसिएशन अध्यक्ष डॉ. करवीत कौर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात कर्करोग बाबत जनजागृती, निदान व औषधोपचार करत कर्क रोगावर कायमस्वरूपी प्रकल्प राबविण्याचा संकल्प सौ. ठाकरे यांनी केला आहे. महिलांची मैत्रीतून सेवाभाव वाढवत जाऊन सबलीकरण व उत्तम आरोग्य ही संकल्पना यशस्वी करणार आहेत. या पदग्रहण समारंभास असोसिएशन कोषाध्यक्ष मिनल लाठी, माजी चेअरमन डॉ. कल्पना महाजन, वर्षा कोतापल्लीकर, डॉ. अलका भावसार, प्रेरणा बेळे, जुलेखा शुक्ल, संगिता घोडेगावकर, गौरी दौंड, वैजयंती पाठक यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील रोटरी व इनरव्हील पदाधिकारी उपस्थित होते.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: