Saturday , December 3 2022
Breaking News

प्रवासी महिलांच्या बॅगा अदलाबदली.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- एस. टी. ने प्रवास करीत असतांना दोन सारख्या दिसणाऱ्या बैंगांची अदला- ही महिलांची भेट घडवून आणल्याने त्यांना आपली बॅग परत मिळाली.

मालेगाव बसस्थानकात चाळीसगावहून आलेल्या एका बसमधून उंबरखेड, पुणे येथील प्रवाशी महिला उतरल्या. दोन ही महिलांची बॅग सारखी असल्याने गर्दीत त्यांची अदला-बदली झाली. दरम्यान, उंबरखेड येथील महिला बैंग घेवून नाशिककडे रवाना झाली तर दुसरी महिला बसस्थानकात पुणेकडे जाणाऱ्या बसची वाट पहात असतांना बॅगांची अदला-बदली झाल्याचे तिच्या लक्षात आले.

आगार प्रमुख यांच्यासह पोलिसांशी संपर्क साधून घडल्याप्रकाराची माहिती दिली. संबंधितांनी बॅगमधील सामान व कागदपत्रांच्या अधारे तत्काळ संपर्क साधत नाशिककडे रवाना झालेल्या महिलेशी फोनवरुन चर्चा केली. सदर महिला तत्काळ प्रवासातून परत आल्याने दोन महिलांच्या बॅगची खात्री करुन त्यांना आपआपल्या बॅग परत करण्यात आल्या. दोन ही बॅगमध्ये मौल्यवान सामानासह दागिने व रोकड असा मुद्देमाल होता. यावेळी पोलीस अमलदार पानझाडे, कोळी यांच्यासह प्रवाशीमित्र शरीफ खान उपस्थित होते.

About किरण सोनवणे

Check Also

निफाड तालुक़ा राष्ट्रवादी युवकच्या वतीने अब्दुल सत्तरांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

मनिष शेलार बागलाण (सटाणा) सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (७ नोव्हेंबर २०२२)- आदरणीय सुप्रिया ताई सुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: