Thursday , December 8 2022
Breaking News

ट्रॅक्टरवरुण तोल जाऊन चाकाखाली सापडुन पाच वर्षांच्या मुलाचा दुर्दैवाने मृत्यू.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- गंगापूर शिवारात ट्रॅक्टरवरून तोल गेला आणि चाकाखाली सापडून राघव दिनकर शिंदे (५, रा. शिंदे चाल, ध्रुवनगर, गंगापूर रोड) असे मयत मुलाचे नाव असून, पाच वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली.

दिनकर शिंदे (३८) यांनी ट्रॅक्टरला पाण्याचा टँकर जोडला. त्यावेळी त्यांनी ट्रॅक्टरवर त्यांच्या डाव्या बाजुला त्यांचा पाच वर्षांचा मुलगा राघव यास बसविले. ट्रॅक्टर चालू करून ते चालवित असताना, काही अंतरावर गेले. याच दरम्यान त्यांचा मुलगा राघव याचा तोल गेला आणि तो ट्रॅक्टरवरून खाली पडला. या दूर्घटनेमध्ये राघव ट्रॅक्टरच्या डाव्या बाजुकडील चाकाखाली सापडला आणि गंभीररित्या जखमी होऊन या दर्दैवी घटनेत त्याचा मृत्यु झाला.याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यामध्ये पिता दिनकर शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेंडेकर हे करीत आहेत.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: