Thursday , December 8 2022
Breaking News

मविप्र निवडणूकीत अशोक मुरकुटे यांना संधी द्या.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचेच्या आगामी निवडणूकीत संस्थापक कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांचे नातू अशोक मुरकुटे यांना सिन्नर तालुक्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा आग्रह सभासद, सेवकवर्ग व मराठा समाज बांधवांककडून केला जात आहे.

संस्थेची मागील पंचवार्षिक निवडणूक तालुक्यातून बिनविरोध होईल असे वाटत होते. तेव्हा कुठल्याही प्रकारची तयारी नसतांना माजी खासदार प्रताप सोनवणे व नितिन ठाकरे यांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर समाज विकास पॅनलकडून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. त्यांना निवडणुकीतून माघारीसाठी विद्यमान कार्यकारिणीने सर्व प्रकारे साम, दाम, दंड, भेद वापरण्याच्या पर्यंत केला. मात्र, त्यांनी न खचता लोकवर्गणीतून निवडणूक लढवली. मुरकुटे हे नितीन ठाकरे यांचे एकनिष्ठ व विश्वासातील सभासद अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी संस्थेच्या मेडिकल महाविद्यालयात अनेक वर्ष विनाअनुदानावर तुटपुंज्या पगारावर काम केले. त्यांनी विनाअनुदानित सेवकांचा प्रश्न नेहमीच लावून धरला व तसेच संस्थेत प्रवेश प्रक्रियेत होणारे गैरव्यवहार, सभासद पाल्यांना प्रवेशा दरम्यान विकास निधी नावाखाली मागितले जाणारे डोनेशन्स अशा अनेक मुद्यांना वारंवार विरोध केला. त्यामुळे त्यांना मुरकुटे यांना पुन्हा एकदा सिन्नर तालुक्यातून उमेदवारी मिळावी अशी मागणी अॅड. शिवराज नवले यांच्यासह सभासद करत आहेत.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: