Thursday , December 8 2022
Breaking News

कोट्यवधी रुपयाचा निधी असलेला ..हदगावातील हातवटी नाल्याच्या बोगस कामाची चौकशी करा..

गजानन जिदेवार तालुका विशेष प्रतिनिधी हदगाव जि.नांदेड

हदगाव : हदगाव शहरातील मुख्य हातवट्टी नाल्याचे आरसीसी चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता घाईगडबडीत उरखण्यात येत आहे . या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंत्राट दारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबत कारवाई न झाल्यास ४जुलै २०२२ पासून उपोषणास बसण्याचा इशारा एमआयएमचे तालुका अध्यक्ष शेख अहमद यांनी एका निवेदनाद्वारे दिल्या होता पण तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कडून चौकशीचे आश्वासन दिल्याने त्यांनी काही दिवसाकरिता उपोषण मागे घेतले आहे.
याबाबतीत माहिती अशी की हादगाव शहरातील मुख्य हातवट्टी नाल्याचे काम अर्धवट करण्यात आले होते यामध्ये मुस्लिम बहुल बागातच हे काम अपूर्ण होते परिणाम स्वरूप दत्तबर्डी महाराणाची पावसाळ्याचे पाणी तेथील रहिवाशांच्या घरात जात होता यामुळे नेहमी प्रवाशांची समस्या निर्माण होत असल्याने हदगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या पुढाकरांनी हा नाल्याची सुमारे १ कोटी ७५ लाख रुपये जवळपास निधी मंजूर करण्यात आला होता ही बाब नगरपालिका प्रशासनामार्फत गोपनीय ठेवण्यात आली होती सदरील काम नगरपालिका प्रशासन की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले याबाबतीत काहीच माहिती देण्यात येत नव्हती हे काम पावसाळ्याच्या तोंडावर घाई घाईने करण्यात येत असल्याने ही बाब नागरिकांच्या दृष्टीस पडल्याने याबाबती संबंधित प्रशासनाकडे अनेक नागरिकांनी नाल्यांचे होत असलेल्या बोगस काम बद्दल तक्रारी केल्या परंतु नेहमीप्रमाणे नगरपालिका प्रशासनाने दखल घेतली नाही घाईघाईने कामास भर पावसात सुरू ठेवले होते शेवटी एमआयएमचे तालुका अध्यक्ष यांनी २९ जून २०२२ रोजी या बोगस कामाच्या जिल्हाधिकारी नांदेडला याबाबतीत निवेदन देऊन तक्रार केली नेहमीप्रमाणे जिल्हा प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने त्यांनी सदरील बोगस कामाची चौकशी न झाल्यास ४ जुलै २०२२ रोजी उपोषणास बसण्याच्या इशारा दिला होता त्या अनुषंगाने उपोषण स्थळी हदगाव तालुक्याचे तहसीलदार तथा दंडाधिकारी युवराज दापकर यांनी सदरील कामाच्या बाबतीत संबंधितांना लेखी ज्या विचारल्या जाईल अशी आश्वासन दिले. त्यामुळे काही काळापुरते एमआयएमचे तालुका अध्यक्ष अहमद चाऊस यांनी दिल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले यावेळी शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार उपस्थित होते…

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: