Thursday , December 8 2022
Breaking News

पोलीस कर्मचार्‍यांना केले रेनकोटचे वाटप

सौ.मनिषा मसुरकर विशेष प्रतिनिधी ठाणे शहर जिल्हा ठाणे
मो.नं. ९७६९९१६८६५

ठाणे : ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता जनतेसाठी अहोरात्र सेवा बजावणारे महाराष्ट्र पोलीस खात्याच्या कर्मचार्‍यांना आपण सर्वच ठिकाणी पाहत असतो. याच पोलीस कर्मचार्‍यांना पावसात सुद्धा कर्तव्य बजावता यावे म्हणून उत्तम दर्जाचे रेनकोट समाजसेवक सुरेश खुशलानी यांच्या वतीने देण्यात आले.

ठाणे शहर ट्राफिक विभागाच्या मुख्य कार्यालयात या रेनकोटचे वाटप करण्यात आले. काही वर्षांपासून सुरु केलेल्या या मोहिमेत आता चांगलाच प्रतिसाद मिळत असून खुशलानी यांच्यावतीने ठाणे शहर वाहतूक विभाग अत्यरित येणार्‍या सर्व युनिट करिता हे रेनकोट वाटप करण्यात आले.

जनतेची सेवा करत असताना ऊन, वारा, पाऊस अशी कोणतीही पर्वा न करता अहोरात्र रस्त्यावर उभे असलेल्या या कर्मचार्‍यांप्रती आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजसेवक सुरेश खुशलानी यांनी हा उपक्रम राबविला. येत्या काळात वाहतूक पोलिसांकरिता सर्वतोपरी मदत करण्याचे खुशलानी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: