Thursday , December 8 2022
Breaking News

संस्था सचिवास शिवीगाळ, शिक्षकांवर गुन्हा दाखल

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा

भंडारा:-तुझ्यामुळे ग्रँड मंजूर होत नसल्यामुळे आम्हाला पगार मिळत नाही. या कारणावरून शिक्षण संस्था सचिवाला घरी जाऊन अश्लील शिवीगाळ करणाऱ्या शिक्षकांवर संस्था सचिव हरेंद्र रामचंद्र खोब्रागडे(४८) रा. दिघोरी/नांन्होरी यांचे फिर्यादी वरून ५ शिक्षक व एका परिचरावर लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हर्षल नाशिकराव घोडेस्वार(३४) धुकेश्वरी मंदिर वार्ड क्र.१ देवरी, अरविंद प्रभाकर लांजेवार(२९) पंचशील चौक देवरी, देवराम सीताराम भोयर(४९) हलबिटोला, ज्ञानेश्वर महारूकांबळे(३२) परसोडी, शंकर काशीराम पुसाम(४७) कोहळी/टोला, तानेश्वर तानसिंग बिसने(३४) ह.मु. शितलामाता मंदिर देवरी अशी त्यांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू असून वृत्त लिही पर्यंत आरोपीस अटक केली गेली नव्हती.
दंडकारण्य बहुद्देशीय शिक्षण संस्था दिघोरी/ना., ता. लाखनी द्वारा संचालित दंडकारण्य निवासी दिव्यांग (अस्थिव्यंग) विद्यालय देवरी, जिल्हा गोंदिया येथे सुरू असून संस्थेचे सचिव हरेंद्र रामचंद्र खोब्रागडे रा. दिघोरी हे आहेत. सदर संस्थेला ग्रँड मंजूर करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापही ग्रँड मिळाली नसल्यामुळे शिक्षकांना पगार दिला जाते नाही. दिनांक २७ मार्च २०२२ चे रात्री ८:३० वाजता संस्था सचिव आपले राहते घरी हजर असताना हर्षल घोडेस्वार, अरविंद लांजेवार, देवराम भोयर, ज्ञानेश्वर कांबळे, शंकर पुसाम व तानेश्वर बिसने हे त्यांचे राहते घरी येऊन त्यांना अश्लील शब्दात शिवीगाळ केली. आम्ही म्हणतो त्याला शाळा विक नाही तर तुला मारून टाकू कारण आम्हाला तुझ्यामुळे पगार मिळत नाही व ग्रँड मंजूर होत नाही. असे बोलून अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकी देऊन निघून गेले. संस्था सचिव हरेंद्र खोब्रागडे यांचे बायनावरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक १२८/२०२२ कलम १४३, २९४, ५०४, ५०६ भादवि गैरकायद्याची मंडळी जमविने, अश्लील शिवीगाळ करणे व जीव मारण्याची धमकी देणे ह्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार देविदास बागडे, शिपाई संदीप वाघ तपास करीत आहेत. वृत्त लिही पर्यंत आरोपींना अटक केली गेली नव्हती.

About किरण सोनवणे

Check Also

मुरमाडी/तूप येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे

माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांनी मागणी कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: