Sunday , November 27 2022
Breaking News

जनसेवाकडून संस्थेकडून स्वामी विवेकानंदांना अभिवादन.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थापक रामदास भोर होते.संस्थेचे कार्याध्यक्ष बबन काकड, सचिव अर्जुन आव्हाड, माजी सरपंच माधव काकड यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. स्वराज्य संघटनेचे योगेश शिंदे यांनी विवेकानंदांच्या जीवनातील काही घटनांना उजाळा देत त्यांच्या समाजाने त्यांना आदर्श घ्यावा असे आवाहन केले. स्वामी विवेकानंद संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. भारतातील हिंदू सुधारणा चळवळींमध्ये त्यांनी मोलाचे कार्य केले. त्यांनी ब्रिटिशशासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात योगदान दिले. विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यांनी अमेरिका, शिकागोमध्ये हिंदू धर्माचा परिचय करुन दिला असे बबन काकड म्हणाले. यावेळी शंकर आमले, सागर भोर, भरत गुंड, सुधीर मंडोळ, राजेंद्र गुंड, दिलीप काकड, शंकर जाधव, सुनील गोसावी, महेश धोंगड, राहुल तुपे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

About किरण सोनवणे

Check Also

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे कालवश

…आणि त्यांनी चक्क खासदारांच्या कानशीलात लगावली मनिष शेलार (बागलाण) सटाणा सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक(३ नोव्हेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: