Thursday , December 8 2022
Breaking News

माहूर तालुक्यातील पालाईगुडा येथील विज पडून मयत झालेल्या कुटुंबियांना ४ लक्ष र. चा धनादेश …

जयकुमार अडकीने तालुका प्रतिनिधी माहूर जि नांदेड 9623410732

माहूर :-तालुक्यातील मौजे पालाईगुडा येथे विज पडून मयत झालेल्या इसमाच्या कुटुंबियाना माहूर तहसील कार्यालयाच्या वतीने आज रोजी ४ लक्ष रूपयाच्या धनादेसाचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील मौजे पालाईगुडा येथे दि. १९ मे २०२२ रोजी सकाळी ७ वा च्या दरम्यान येथील गणेश नुरसिंग राठोज यांच्या शेतात मजूरीने कुठार भरत असताना किरण गेमसिंग जाधव वय ३८ यांच्या अंगावर विज पडली… यात त्याचा जागीच मृत्यू झाला… सदर घटनेचा महसूल विभागाने पंचनामा व आवश्यक ती कारवाई करून शासनाकडे अहवाल पाठवला. तहसिलदार किशोर यादव यांनी संबंधित कुटुंबियांना शासनाच्या वतीने तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले. परिणामी अवघ्या दोन महिण्याच्या आत संबंधित कुटुंबियांना शासनाची मदत मिळवून देण्यात यश आले.
दरम्यान माहूरचे तहसीलदार किशोर यांदव यांच्यासह तलाठी व्ही.पी. राजूरवार, मंडळ अधिकारी जी.पी. पदकोंडे तसेच महसूल सहाय्यक पद्मा निलगीलवार व महसूल कर्मचा-यांच्या
पाठपुराव्यामुळे मयत किरण गेमसिंग जाधव यांची पत्नी श्रीमती विद्याबाई किरण जाधव व त्यांची अपत्ये पृथ्वीराज वय ७ व युवराज वय ४ वर्षे यांना तहसीलदार माहूर यांच्या हस्ते ४ लक्ष रूपयाच्या धनादेश सुपुर्द करण्यात आला… यावेळी सरपंच संजय कुमरे यांच्यासह रोजगार सेवक प्रल्हाद राठोड, ग्रा.पं. सदस्य निरंजन राठोड हे कुटुंबियांच्या वतीने हजर होते.

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: