Thursday , December 8 2022
Breaking News

प्लास्टरच्या मुर्ती बनवणाऱ्या मुर्तीकारांना नोटिस.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेने मूर्तिकांरासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या असून, प्लास्टरच्या मूर्ती तयार करणाऱ्या पंचवटीतील कारागिरांना सूचना देण्यात आल्या.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केलेले नियम मूर्तिकारांना समजावून सांगण्यात आले. गणेशोत्सवाला अजून दोन महिने बाकी आहेत. अजूनही काही मूर्तिकारांनी प्लास्टरच्या मूर्ती तयार केलेल्या नाहीत.

या मूर्ती तयार झाल्यानंतर मूर्तिकारांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ नये यासाठी त्यांना समज देण्यात आली. यावेळी मूर्तिकारांनीदेखील सकारात्मकता दर्शविली असून, न्यायालयाचा आदेश मानण्याचे कबूल केले आहे. काही लोक शाडू मातीच्या मूर्ती घेत नाहीत, तर प्लास्टरच्या मूर्तीना पसंती देतात असे मूर्तिकारानी सांगितले. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित करण्यास परवानगी नसल्याचे यावेळी त्यांना सांगण्यात आले. त्याचप्रमाणे केमिकलचे रंग वापरू नये, अशा सूचना करण्यात आल्या.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: