Thursday , December 8 2022
Breaking News

जायखेडा येथे कृषीदुतांकडून माती व पाणी परिक्षणाबाबत जनजागृती

मनिष शेलार बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र 

 

बागलाण(२४ नोव्हेंबर २०२२): बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मालेगाव येथील एच.एच श्री श्री मुरलीधर स्वामीजी कृषी महाविद्यालया च्या ग्रामीण कृषी कार्यानुभावतर्गत कृषी दुतांकडून माती व पाणी परिक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. कृषी दुतांनी ग्रामस्थांना माती व पाणी परिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

 

माती व पाण्याचे नमुने कसे घ्यावेत याबद्दल कृषी दुत भरत दुकळे, बोरगुडे प्रथमेश, वगरे करन, गवारे श्रेयश, म्हसदे भूषण, नेहेरे अविराज व आल्हाट विरेंद्र यांनी माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्याने शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमासाठी कृषीदूतांना, प्रा डॉ. पी.ए. तुरखठमठ, उपप्राचार्य डॉ. एस.ए. राऊत, प्रा. व्ही. डी ह्याळीज . व प्रा. शैलेश अहिरे, प्रा. डॉ. प्रणिती सोनवणे, साजल देशमुख, प्रवीण शेवाळे, गौरव खैरे यांचे मार्गदर्शन लाभले.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: