Thursday , December 8 2022
Breaking News

सटाण्यात राष्ट्रवादीचे जोडो मारो आंदोलन

मनीष शेलार(सटाणा) बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र

सटाणा-( ०७/११/२०२२)- राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रियाताई सुळे आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ येथील बसस्थानकासमोर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेचे जोडो मारो आंदोलनसह दहन करण्यात आले.
बागलाण तालुका महाविकास आघाडीच्या वतीने सोमवार (दि ७)सायं सहा वाजेच्या सुमारास मा आमदार दीपिका चव्हाण,संजय चव्हाण तालुकाध्यक्ष केशवराज मांडवडे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात आले,अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषय एकेरी भाषेत अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत,त्यामुळे सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या संयुक्त विद्यमाने कुठलीही पूर्व सूचना न देता तीव्र आंदोलन छेडण्यात आले, यावेळी पोलीस प्रशासनाची धावपळ बघावयास मिळाली,सायंकाळी झालेल्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा बघावयास मिळाल्या,यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणा देऊन तालुक्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
यावेळी मा आमदार दीपिका चव्हाण,संजय चव्हाण,शिवसेनेचे लालचंद चव्हाण,काँग्रेसचे किशोर कदम,राजेंद्र सोनवणे,अमोल बच्छाव यांनी भाषणे केली,यावेळी आंदोलनात ज ल पाटील,भारत खैरनार, मनोज सोनवणे,शरद शेवाळे,डाँ व्ही के येवलकर,जनार्धन सोनवणे,आनंद सोनवणे,नितीन सोनवणे,राजेंद्र सावकार,सनिर देवरे,निखिल खैरनार,भारत काटके, संजय पवार,सुमित वाघ,सुरेखा बच्छाव,उषा भामरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: