Thursday , December 8 2022
Breaking News

मालेगावात राष्ट्रवादी कांग्रेस तर्फे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना जोडे मारो आंदोलन

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र राज्य

मालेगाव (११ नोव्हेंबर २०२२) – मालेगाव तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संसद रत्न आदरणीय खासदार सौ. सुप्रिया ताई सुळे यांच्या विषयी अपशब्द वापरून व खालच्या पातळीवर टीका करणारे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सतार यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गांधी पुतळा मोसम पूल येथे जोडो मारोआंदोलन करण्यात आले. समस्त महिलांचा अपमान केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते आक्रमक झाले. सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणा करण्यात आली. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा . राजीनामा देण्याच्या अगोदर माफी मागावी व त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी तक्रार छावणी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पो निरीक्षक जयेश पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आली .तालुका अध्यक्ष संदीप पवार, एजाज उमर ,शकील बेग ,जयेश आहिरे, मनमोहन शेवाळे, यांच्या नेतृत्वातकरण्यात आले. या प्रसंगी प्रकाश वाघ ,अन्सारी असीम, रॉकी सुजलदेवरे ,निलेश पाटील, अस्लम अन्सारी ,नजमा निसार ,अहेमद फातिमा,मो,हारून यास्मिन सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: