Thursday , December 8 2022
Breaking News

ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या – आम आदमी पार्टीची मागणी

मुख्यमंत्री व सर्व संबंधितां ना निवेदन देऊन धरला आग्रह!!

विकास पाटील जिल्हा विभागीय संपादक जळगांव सुराज्य न्यूज महाराष्ट्र

जळगाव (३१ ऑक्टोबर २०२२)-  अती वृष्टीत शेतकऱ्याचे पीक नव्हे तर संसार वाहून गेला. असताना त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही.कापूस व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाचे अधिकारी, तलाठी व प्रशासन पंचनामा करायला येत नाही. फोटो काढून पाठवा असे सांगतात. ही मनमानी बंद व्हायला हवी. कारण अनेक शेतकरी बांधवांना ऑनलाईन काही जमत नाही.  प्रत्यक्ष पंचनामे झाल्यावर सत्य परिस्थिती दिसते. प्रशासनाने प्रत्यक्ष पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या  अशाप्रकारची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

आप चे राज्य सचिव धनंजय शिंदे,  जिल्हाध्यक्ष प्रा. तुषार निकम व वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुका अध्यक्ष संतोष बाबुराव पाटील , प्रा. गणेश पवार, नाना पाटील, राजेंद्र पाटील, भागवत बाविस्कर, स्वप्नील पाटील, नंदु पाटील, रामकृष्ण देवरे, महेंद्र साळुंके, सलीम वायरमन, मुकेश राजपूत, संजीव पाटील, उमाकांत ठाकूर, शहर व तालुका पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री, प्रांत, तहसीलदार, कृषी अधिकारी व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी  करण्यात आली.
अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला . शेतकरी बांधवांना न्याय मिळावा म्हणून आग्रह धारणाऱ्या आम आदमी पार्टीचे वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे धनंजय सोनार यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: