Thursday , December 8 2022
Breaking News

बाक्टी येथे शाळा पूर्व तयारी अभियान उत्साहात

सरगम शाहारे अर्जुनी मोरगाव तालुका प्रतिनिधी जि.गोंदिया

अर्जुनी मोरगाव:-तालुक्यातील चान्ना – बाक्टी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी २९ जून रोजी शाळा पूर्व तयारी अभियानाअंतर्गत अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . उद्घाटक जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते करण्यात आले . अध्यक्षस्थानी सरपंच देविका मरसकोल्हे होत्या. पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य कुंदा लोगडे,शाळा समितीचे अध्यक्ष तुलाराम डोंगरवार , उपाध्यक्ष आशा फुडे , अरुण सयाम , सूर्यकांता पुराम , अंगणवाडी कार्यकर्ता सुनीता मेश्राम उपस्थित होते . प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेविषयी आपुलकी वाढावी व त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता वर्ग सजावट, शालेय परिसरात तोरणे . पताके लावून शाळा परिसर आकर्षिक पद्धतीने सजविण्यात आले होते .

सकाळी ९ .३० वाजता शाळा शाळा पूर्व तयारी क्रमांक -२ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यात इयत्ता पहिलीमध्ये नव्यानेच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले . त्यांना पाठ्यपुस्तके व लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले . ७ उपक्रमांचे स्टॉल यावेळी शाळेत लावण्यात आले होते , व विद्यार्थ्याकडून वेगवेगळ्या कृती यावेळी करून घेण्यात आल्यात . संचालन विषय शिक्षक संदेश शेंडे यांनी केले . आभार हरेंद्र मेश्राम यांनी मानले . कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख दिलीप टेंभुर्णे , मुख्याध्यापक डी . टी . सलामे , एम . एन . नाकाडे , पी . एम . मेश्राम , पी . मी . आय . गेडाम पी . मोहबंसी यांच्यासह शाळे व्यवस्थापन समिती पदाधिकारी व पालकांनी सहकार्य केले . कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक , विद्यार्थी व पालक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते .

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: