Thursday , December 8 2022
Breaking News

दोन दुचाकींमध्ये अपघात, एक जण जखमी.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- शहरातील सरदवाडी रोड परिसरात वाजे लॉन्ससमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण जखमी झाल्याची घटना घडली. औषधविक्रते अमित दराडे हे सायंकाळी आपल्या 4 वर्षांच्या मुलाला घेऊन आपल्या स्कुटरने सरदवाडी रोडने जात असताना समोरुन स्प्लेंडर दुचाकी क्र. एम. एच. 28 बी. आर. 4590 ने भरधाव वेगात आलेल्या दुचाकीधारकाने त्याना जोरदार धडक दिली. दराडे यांनी प्रसंगावधान राखत मुलाला घेऊन बाजूला उडी घेतल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. अपघातात त्यांच्या स्कुटरचे मोठे नुकसान झाले. मात्र, समोरुन ठोसर मारलेल्या मद्यधुंद दुचाकीचालक हा नशेत दुरवर फेकला गेला. यामुळे त्यांच्या डोनयास दुखापत झाली. स्थानिकांनी धाव त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, डोनयाला मार लागल्याने तो बेशुद्ध झाल्याचे बघायला मिळाले. स्थानिकांनी रुग्णवाहिकेला पाचारण करत सदर इमसास रुग्णालयात दाखल केले. यावेळी रस्त्यावर गर्दी झाल्याने काही काळ वाहतुकीसही खोळंबा झाला होता.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: