Thursday , December 8 2022
Breaking News

गोंदे फाटा ते दापुर रस्त्याची दुरावस्था.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:– सिन्नर व अकोले या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या तालुक्यातील गोंदे फाटा ते दापूर हा सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून तात्काळ हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी दापूरचे सरपंच रमेश आव्हाड यांनी केली आहे.

सिन्नर व अकोले या महत्वाच्या तालुनयाला जोडणारा एकमेव रस्ता असल्याने

या रस्त्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अकोले तालुनयातून सिन्नरच्या औद्योगिक वसाहतीत अनेक तरुण कामासाठी येत असतात. मात्र, गेल्या 3 वर्षांपासून समृद्धी महामार्गासाठी गौण खनिज वाहणाऱ्या अवजड वाहनांमुळे हा रस्ता नादुरुस्त झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकारी मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांचे अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपासून शाळा व महाविद्यालय सुरु झाल्याने या रस्त्याने विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे. तसेच विविध शासकीय दाखले व अन्य कामासाठी सिन्नरला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. अकोलेवरुन सिन्नरला येण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने वाहनांची 24 तास वर्दळ असते. मात्र, गोंदे फाटा ते दापुर रस्त्यावरील खड्डयामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: