Saturday , December 3 2022
Breaking News

स्कूल चले हम यावे ज्ञानासाठी निघावे जनसेवेसाठी

संघरत्न उके कुही तालुका प्रतिनिधी जिल्हा नागपूर मो 9764421627

भारत देशातील सर्व पालकांना विनंती की  शाळा सुरू झाल्या आहेत तरी आपल्या मुलांना शाळेत विद्यार्थी म्हणूनच पाठवा. काही मुद्दे खालीलप्रमाणे असावेत

1)त्याच्या केसांची ठेवण व्यवस्थित असावी.साधी ठेवन असावी.उगीचच वेगवेगळे कट मारू नका.
2)पायातील बुट दिडशे दोनशे रुपया पेक्षा जास्त किमतीचे नसावेत. साधेच असावेत.साध्या माणसासारखे.
3)शालेय गणवेश व्यतिरिक्त इतर ड्रेस वर जास्त खर्च करू नका
4)वह्या आणि पुस्तके योग्य तेवढीच घ्या….
5)दादाचा मुलगा भाऊचा मुलगा, पाटलाचा मुलगा,या उपाध्या घरीच ठेवून फक्त विद्यार्थी म्हणूनच शाळेत पाठवून द्या.
6)अँड्रॉइड मोबाईल पासून मुलांना दुर ठेवा…..
7)मुलांचे चुकीचे लाड आणि हट्ट पुरवू नका…..
8)तुमची क्षमता असली तरी आपल्याकडे काहीतरी कमी आहे, उणीव आहे पैसे जमवण्यासाठी खुप कष्ट लागतात हे त्याच्या लक्षात येऊ द्या……
9)पैशाचे महत्त्व त्याला कळू द्या….
10)शाळेत पाठवताना त्याच्याकडे एकही रूपया देऊ नका… आवश्यकता वाटल्यास स्वतः शाळेत जा…..
11)आपल्या मुलांना शिक्षीत बनवण्यापेक्षा सुशिक्षित बनवण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करा….
12) २४ तासांपैकी कमीत कमी एक तास मुलांसोबत बसून अभ्यास घ्या….
13)आपली मुलं विकृत विचारसरणीच्या सहवासात जात असतील तर त्यांना वेळीच त्या सहवासातून बाजूला घ्या… जास्तीत जास्त तुमच्या सहवासात ठेवा…..
14)महीन्यातून कमीत कमी दोन वेळा शिक्षकांना भेटायला नक्की जा….
15)तुमच्या सहकार्याशिवाय शिक्षक मुलांमध्ये बदल घडवूच शकत नाहीत…
16)मुलांना एकदा शाळेत पाठवले की आपली जबाबदारी संपली असे समजू नका…
17)आपल्या मुलांना शिक्षक योग्य संस्कार आणि शिक्षण देतात की नाही ते तपासून पाहत जा आणि नसेल तर ते शिक्षकांच्या लक्षात आणून द्या…
18)शिक्षकांचा मान सन्मान करायला आपल्या पाल्यांला  सांगा आणि ते कृतीतून दाखवून द्या.. चला तर मग आपण आपल्या देशाचे एक चांगले दक्ष व सुसंस्कृत नागरिक होवू या….. आणि वरील सुचना पाळू या….
चला तर मग शाळेत जावूया…….. असी संकल्पना *मा.सौ.बाली संघरत्न उके(आदर्श शिक्षका,तथा गट ग्राम पंचायत सदस्या म्हसली)* यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे तरी सर्व सन्माननीय आई,बाबा आणि परीवारातील सर्व लोकांनी वरील विषयांची नोंद घ्यावी

About किरण सोनवणे

Check Also

सोशल मीडिया

सुराज्य न्युज या न्युज नेटवर्क मध्ये आपले स्वागत… जर आपल्याला whatsapp वर बातम्या हव्या असल्यास …

One comment

  1. Chandrasekhar kapse

    Best

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: