Thursday , December 8 2022
Breaking News

संत तुकोबाच्या पालखीच्या आगमनासाठी अकलूज नगरी सज्ज : मुख्याधिकारी गोरे

सोमनाथ खंडागळे जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण सोलापूर

सोलापूर :अकलूज नगर परिषेदेच्या वतीने पालखी आगमन व मुक्कामाच्या दुष्टीने रस्त्यांवरील खड्डे शहर स्वच्छता स्ट्रीट लाईट व इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध केल्या असून अकलूज नगरी पालखीच्या स्वागतासाठी सज्ज असल्याची माहिती मुख्य अधिकारी दयानंद गोरे यांनी दिली

जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात सराटी येथे आगमन होत असून अकलूज नगरीत या पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. सराटी येथील निरा नदिवरील पुलापासून अकलूजमधील  गांधी चौक, विजय चौक, विठ्ठल मंदिर आंबेडकर चौक या  रस्त्यांवरील सर्व  खड्डे भरून घेण्यात आले आहेत. रस्त्याचे दुभाजक स्वच्छ करून शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. अत्यावश्यक सेवा विभागातर्फे स्वच्छता केली जात असून शहरातून धुराची फवारणी केली आहे. तसेच जंतुनाशक पावडर उपलब्ध केली असून पालखीच्या दिवशी आवश्यक त्या ठिकाणी  वापरण्यात येईल.
पालखी काळात बारा ठिकाणी 800 युनिट फिरते शौचालय ठेवण्यात येणार असून या ठिकाणी पाणी व विद्युत व्यवस्थेचे नियोजन करण्यात आलेले आहे.
पालखी बरोबर असणाऱ्या टँकरला पिण्याची पाणी मिळावे यासाठी माळेवाडी येथील दोन  खाजगी कुपनलिका उपलब्ध केल्या असून या कुपनालिकेत टीसीएल पावडर टाकण्याच़ काम सध्या चालू आहे. तसेच वापरासाठी पाण्याची चार ठिकाणी सोय केली असून अकलाई मंदिर, जुने बाजार तळ, बहुउद्देशीय सभागृह या ठिकाणी वापरासाठीचे पाणी भरून मिळेल

पालखी काळात आपत्कालीन कक्ष सदाशिवराव माने विद्यालयात उभा केला जाणार असून त्याच ठिकाणी हिरकणी कक्ष व सॅनिटरी नॅपकिन वाटप कक्ष उभारण्यात येणार आहे  या कक्षात महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

पालखी दिवशी नागरिकांना व्यवस्थित दर्शन करता यावे यासाठी सदाशिवराव माने विद्यालयात दर्शनबारी बांधली जात असून  स्थानिक संघटनेचे कार्यकर्ते व 600 पोलीस मित्र यांच्या मदतीने दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर आपत्कालीन व्यवस्था म्हणून सहकार महर्षी कारखान्याच्या अग्निशामनची सुविधा उपलब्ध करून ठेवण्यात आली आहे‌. गर्दी व  अपघात टाळण्याच्या दृष्टीने पालखीच्या मुख्य मार्गावर पथविक्रेत्यांना बंदी घालण्यात आली असल्याची माहिती श्री गोरे यांनी दिली.

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: