Saturday , December 3 2022
Breaking News

पत्ता विचारण्याचा बहाणा करून, दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावून चोरी केला.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- पंचवटीतील पांजरापोळ जवळ पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावून घेतल्याची घटना घडली. ठोंबरे पंचवटीतील निमाणी बस स्टॉप समोरी पांजरापोळ भागातून मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली.

स्कुटरवर आलेल्या दोघांपैकी एकाने पत्ता विचारण्याचा बहाणा करून भामट्यांनी सुमारे १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केला. प्रकाश आबासाहेब ठोंबरे (४२ रा. गणेश चौक, रामवाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.

About किरण सोनवणे

Check Also

निफाड तालुक़ा राष्ट्रवादी युवकच्या वतीने अब्दुल सत्तरांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

मनिष शेलार बागलाण (सटाणा) सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (७ नोव्हेंबर २०२२)- आदरणीय सुप्रिया ताई सुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: