Thursday , December 8 2022
Breaking News

आदिवासी मुला-मुलींच्या शिक्षणाचे हाल तात्काळ थांबवा – मनविसेची आदिवासी आयुक्तांकडे मागणी.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- नाशिक विभागातील ग्रामीण भागांत आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण घेतल्यावर पुढील शिक्षणासाठी शासकीय आदिवासी आश्रम शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या गोरगरीब आदिवासी मुला-मुलींच्या नशिबी शिक्षणाच्या नावावर हेळसांडच येत असल्याच्या तक्रारी आहेत. आदिवासी आश्रम शाळांमधील तुकड्यांची संख्या न वाढवता शिक्षणाच्या हक्काच्या नावाखाली सरसकट सर्वांना प्रवेश देण्यात येतात.

आश्रम शाळांमध्ये इयत्ता ०८ वी ते १२ वीच्या एका-एका वर्गात १०० ते १५० मुले शिक्षण घेत असल्याचे विदारक चित्र बघायला मिळतंय. आधीच शिक्षणाच्या गुणवत्तेच्या नावावर दैन्यावस्था असलेल्या या आश्रम शाळांवर या अतिरिक्त विद्यार्थी संख्येमुळे प्रचंड ताण पडत असून गुणवत्ताशून्य शिक्षण घेऊन येथून बाहेर पडणाऱ्या गरीब आदिवासी मुलांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय आदिवासी आश्रम शाळांमधील इयत्ता ०८ वी ते १२ वीच्या तुकड्या तात्काळ वाढवून या आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे हाल तात्काळ थांबवावे असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आदिवासी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या वेळी मा. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक विभाग यांनी याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, मनविसे जिल्हाध्यक्ष कौशल (बब्बू) पाटील, मनविसे शहराध्यक्ष ललित वाघ, शारीरिक सेना शहराध्यक्ष विजय आगळे, मनविसे शहर सरचिटणीस अमोल भालेराव, मनविसे विभाग अध्यक्ष अक्षय गवळी, मेघराज नवले, शुभम गायकवाड, ● अविनाश जाधव आदि पदाधिकारी उपस्थित होते.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: