Thursday , December 8 2022
Breaking News

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार यांचा विविध उपक्रमांनी वाढिवस साजरा

सोमनाथ खंडागळे जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण जि .सोलापूर

सोलापूर : प्रेस संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य उपाध्यक्ष विशाल पवार, मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा सरचिटणीस हरजिनदरसिंग सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा तालुका अध्यक्ष शिवराज पाटील पवार यांचा वाढदिवस लोहा येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना डॉक्टरांच्या व पत्रकारांच्या उपस्थितीत केळी, सफरचंद आदी फळे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. पूर्वा सरकार यांचा डॉक्टर डे दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेस संपादक पत्रकार संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, स्वाभिमानी भीमसेनेचे लोहा-कंधार विधानसभा प्रमुख तथा पत्रकार विलास सावळे, ज्येष्ठ पत्रकार तथा जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे, कार्याध्यक्ष तथा दैनिक सकाळचे पत्रकार बापू गायकर, तालुका उपाध्यक्ष संजय कहाळेकर, सचिव मारोती चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख शिवराज दाढेल, सहसचिव टी. के. दाढेल, कोषाध्यक्ष पत्रकार रमेश पवार, छायाचित्रकार विनोद महाबळे, प्रेरक संघटनेचे सोनकांबळे चिखलभोसीकर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
तसेच शिवराज पाटील पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धावरी येथील जि.प. प्रा.शाळेला आंब्याचे वृक्ष भेट देऊन फळझाडांची लागवड करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक बी.वाय. चव्हाण, सहशिक्षक आर.पी. पवार, सहशिक्षिका सौ.एल. व्ही. जोशी, सहशिक्षक एस.बी. घोडके, संजय तेललवार, गोवर्धन चव्हाण, पि.आर. चिखलभोसीकर आदींची उपस्थिती होती.
प्रेस संपादक पत्रकार संघाचे लोहा तालुका अध्यक्ष शिवराज पाटील पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल पुष्पहार घालून पेढा भरवून नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक करिम शेख, स्वाभिमानी भीमसेनेचे लोहा-कंधार विधानसभा अध्यक्ष विलास सावळे, सचिन मुकादम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवराज पाटील पवार, बुलढाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक केशवराव शेटे, ओमप्रकाश सोनवळे, कदम व त्यांचे सहकारी, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथील प्रदीप हटकर, सुर्यकांत दाढेल, विनायक सेवनकर यांनी तर लोहा येथील पत्रकार विजयकुमार चन्नावार, जिल्हा उपाध्यक्ष केशव पाटील पवार, डी. एन. कांबळे, जगदीश कदम, गोविंद कदम, बाळासाहेब कतूरे, गोविंद वड, तसेच पारडीचे माजी सरपंच दिगांबर पाटील डिकळे, व्यंकट आळणे, जेष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी सर्जेराव टेकाळे, बा. पु. गायकर, पि. डी. पोले, अवधुतवार, आचणे, शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष तथा शिक्षक नेते विठूभाऊ चव्हाण, अनंत चव्हाण, सुधाकर पाटील पवार, अंकुश पाटील कदम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, संपादक अजित पाटील, यज्ञात कोल्हे, संजय चव्हाण, विष्णू आंबेकर, अशोक चव्हाण, राम लिंबोटकर, यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिष्टचिंतनदिनी व्हाट्सअप, फेसबुक, विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या शुभेच्छांचा वर्षाव केला. त्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: