Saturday , December 3 2022
Breaking News

अनाथ मुलीस घेतले दत्तक

पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी दिला मानवतेचा परिचय

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा

भंडारा :- लाखनी तालुक्यातील मुरमाडी/सावरी च्या प्रकाश ठवकर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांच्या विधवेने पुनर्विवाह केल्यामुळे त्यांची १५ वर्षीय मुलगी अनाथ झाली आहे. या बाबद माहिती होताच पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी तिला दत्तक घेऊन बालिग होईपर्यंत शैक्षणिक खर्च उचलण्याचे कबूल केल्याने मानवतेचा परिचय दिला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी लाखनी पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून पोलिस कर्मचाऱ्यांना शिस्त लावल्याने लोकांची कामे वेळेवर होत आहेत. अवैध व्यावसायिकांवर कारवाई तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तीस आर्थिक मदत करून आपण समाजाचे काही देणे लागतो याचा परिचय दिल्याने ते अल्पावधीतच जनतेत लोकप्रिय झाले. शहरात चोऱ्यांचे प्रमाण कमी व्हावे आणि चोरी झालीच तर लवकरात लवकर चोरांचा शोध लागवा. याकरिता शहरातील व्यापाऱ्यांच्या मदतीने शहरात आवश्यक त्या ठिकाणी सीसीटिव्ही लावण्याचा त्यांचा मानस असल्यामुळे जनतेच्या कमाईच्या पैशांना संरक्षण पुरविणे हा हेतू आहे.
मुरमाडी/सावरी येथील प्रकाश ठवकर यांनी डिसेंबर २०२१ मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली होती. घरातील कमावता व्यक्ती गेल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले होते. भरीस भर म्हणून विधवा पत्नीनेही प्रियकरासोबत पळून जाऊन पुनर्विवाह केला. त्यामुळे त्यांची १५ वर्षीय मुलगी अनाथ झाली होती. या बाबद प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून माहिती मिळताच ती बालिग होईपर्यंत तिचा शैक्षणिक खर्च उचलण्याचे पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी कबूल केल्याने पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे सर्वत्र कौतुक होत असून लाखनीस सामाजिकता जोपासणारा पोलिस अधिकारी मिळाल्याच्या चर्चा होत आहेत.

About किरण सोनवणे

Check Also

मुरमाडी/तूप येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे

माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांनी मागणी कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: