Thursday , December 8 2022
Breaking News

मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणीस साहेब व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागावी या साठी घातला दुग्धअभिषेक

सोमनाथ खंडागळे जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण

सोलापूर :-नीरा नरसिंहपुर येथे माढा तालुका भारतीय जनता पार्टी रयत क्रांती संघटना व इतर मित्र पक्ष यांच्या वतीने तसेच टाकळी टे गावातील ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या हिताचे गोरगरीब जनतेचे बारा बलुतेदारांचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची वर्णी लागावी व भारतीय जनता पार्टीचे स्थिर सरकार राज्यात यावे तसेच माननीय आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना मंत्रीपद मिळावे व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माननीय सदाभाऊ खोत साहेब यांचीही मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी फडणवीस साहेबांचे कुलदैवत लक्ष्मी नरसिंह मंदिर नरसिंहपूर येथे दुग्धाभिषेक महापूजा करण्यात आली यावेळी उपस्थित विठ्ठल आबा मस्के रयत क्रांतीचे नेते निवृत्ती तांबवे अध्यक्ष माढा तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी प्राध्यापक बंडगर सर ,दादासाहेब कळसाईत ,भाऊसाहेब काळे अर्जुन चव्हाण, टाकळी टे ग्रामपंचायत सदस्य अजित विठ्ठल घाडगे, भाऊसाहेब लेंगरे, सचिन घाडगे ,अनिल घाडगे, मारुती घाडगे टाकळी टे ग्रामपंचायत सदस्य वैशाली कळसाईत सोबत इतर महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: