Thursday , December 8 2022
Breaking News

शताब्दी महाविद्यालयातून लाखांचे कॉम्प्युटर चोरी.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- तालुक्यातील आगसखिंड येथील शताब्दी इंजिनियरिंग महाविद्यालयातून लाखांचे कॉम्पुटर चोरीला गेल्याची घटना घडली.

महाविद्यंालय काही दिवस बंद असल्याने चोरट्यांनी हा डल्ला मारला आहे. अज्ञात चोरट्यांनी महाविद्यालयातील इलेनट्रॉन्निस अॅन्ड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या लॅबच्या कडी कोयंडा वाकवून लॅबमध्ये ठेवलेले 42 हजारांचे एनओसी कंपनीचे 12 मॉनिटर, 63 हजारांचे लेनोव्हो कंपनीचे 7 व एसर कंपनीचे 1 सीपीयू असा एकुण 1 लाख 5 हजारांचे कॉम्पुटर चोरुन पोबारा केला. नुकताच हा प्रकार उघडकीस आल्याने महाविद्यालाचे प्राचार्य पंकज विसपुते यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीची फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास गणेश परदेशी करत आहेत.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: