Thursday , December 8 2022
Breaking News

सेप्टिक टँकमधून गॅस व धूर, पालिका प्रशासनाने केले शौचालय सील

मनिष मसुरकर विशेष प्रतिनिधी ठाणे जिल्हा
सुराज्य न्युज
मो.नं. : ८८७९३७३१६४

ठाणे (भिवंडी) : सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, भिवंडी शहर महापालिकेच्या शांतीनगर परिसरात असलेल्या सेप्टिक टँकमधून गॅस आणि धूर निघत असल्याची माहिती प्रभाग समिती दोनचे सहा.आयुक्त फैसल ताटली यांना मिळाली.

त्याची तात्काळ दखल घेत स्वच्छतागृह व्यवस्थापन, आरोग्य निरीक्षक मुकादम आदींनी कर्मचार्‍यांसह स्वच्छतागृहाची पाहणी केली व सुरक्षेच्या दृष्टीने स्वच्छतागृहाच्या सेप्टिक टँकमध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे शौचालय सील करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, वाॅर्ड क्रमांक १४, शांतीनगर टिपू सुलतान रोड, नॅशनल मेडिकलच्या मागे असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टिक टँकमधून गॅस आणि धूर निघत होता. त्यामुळे सहा.आयुक्त फैसल ताटली यांनी हे शौचालय सील केले. पाच महिन्यांपूर्वी चव्हाण काॅलनीतील सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टिक टँकच्या स्फोटात एक जण त्याच्या ढिगार्‍याखाली गाडला गेला होता. तर दोन जण गंभीर जखमी झाले होते.

यादृष्टीने खबरदारी म्हणून या घटनेची तात्काळ दखल घेत स्वच्छतागृह व्यवस्थापन, आरोग्य निरीक्षक मुकादम आदींनी कर्मचार्‍यांसह स्वच्छतागृहाची पाहणी केली व सुरक्षेच्या दृष्टीने स्वच्छतागृहाच्या सेप्टिक टँकमध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे शौचालय सील करण्यात आले

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: