Thursday , December 8 2022
Breaking News

दोन वायरमन विरोधात टोरेंट पाॅवर कंपनीकडून गुन्हा नोंद

मनिष मसुरकर विशेष प्रतिनिधी ठाणे जिल्हा
सुराज्य न्युज
मो.नं. : ८८७९३७३१६४

ठाणे (भिवंडी) : सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, टोरेंट पाॅवर कंपनीच्या मिनी सेक्शन पिलरला बेकायदेशीर कनेक्शन देऊन झोपड्यांना वीजपुरवठा करणार्‍या दोन वायरमन विरोधात कंपनीने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या दोघांविरुद्ध वीज कायदा २००३ चे कलम १३८, आयपीसी कलम ३३६, ४२७ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान १९८४ चे कलम ३ नुसार कंपनीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे कार्यकारी कर्मचारी गौरव सुरेंद्र नंदेश्वर काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खंडूपाडा रोडवर सार्वजनिक शौचालयाजवळ असलेल्या अन्सार मोहल्ल्यामध्ये तपासणी करण्यास गेले असता. त्यांना तिथे अवैध व धोकादायक कनेक्शन आढळले.

अधिक चौकशी केली असता इजाबुलहक आणि जैद अन्सारी नावाच्या दोन वायरमन यांनी अन्सार नगरमध्ये राहणार्‍या घरांना टोरेंट कंपनीचे मिनी सेक्शन पिलरमधून बेकायदेशीर कनेक्शन देऊन वीजपुरवठा केला हे स्पष्ट झाले. या केबलमुळे केंव्हाही मोठा अपघात होऊ शकतो.

याशिवाय बेकायदा वीजपुरवठ्यामुळे कंपनीचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजमाळी करत अाहेत.

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: