Thursday , December 8 2022
Breaking News

प्रा. मंगल सांगळे व फार्मासिस्ट प्रियांका केदार यांचा तरुप्रीत उपक्रम बहरला

श्री. सुरेश सांगळे. जिल्हा प्रतिनिधी नाशिक ग्रामीण मो. 7030232020.

नाशिक– सिन्नर तालुक्यातील प्रा.मंगल सांगळे व प्रियांका केदार ह्या युवतींनी गेल्या दोन वर्षांपासून सुरू केलेल्या तरुप्रीत प्रकल्पाअंतर्गत सिन्नरच्या ओसाड माळरानावर बीजारोपण व वृक्षारोपण करण्याचा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
सलग दोन वर्षे ढग्या डोंगर परिसर , जामगांव -पास्ते परिसर , लोणारवाडी, विश्रामगड परिसर अशा अनेक ठिकाणी जवळपास दहा हजारापेक्षा जास्त बीजारोपण केले असून दोनशेहून अधिक वृक्षारोपण केले आहे.
यात प्रामुख्याने सीताफळ , कडुलिंब , गुलमोहर , निलमोहोर , कांचन , करंजी यांसारख्या वृक्षांचे बीजारोपण केले.
सालाबादप्रमाणे यावर्षी देखील प्रा.मंगल सांगळे व त्यांची मैत्रीण प्रियांका केदार यांनी ढग्या डोंगर परिसरात दिनांक ३ जुलै रोजी जवळपास ५०० बियांचे रोपण केले आहे.
कमी पाण्यावर येऊ शकणाऱ्या व जनावरांपासून सुरक्षित राहू शकणाऱ्या सीताफळ , कडुलिंब , गुलमोहर , निलमोहोर , कांचन , करंजी यांसारख्या वृक्षांचे बीजारोपण प्रा.मंगल सांगळे यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील ओसाड माळरानावर हिरवागार निसर्ग फुलविण्यासाठी त्या यापुढेही आणखी उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रा.मंगल सांगळे या सिन्नर तालुक्यातील बारागांव पिंप्री येथील कला व वाणिज्य महाविद्यालय येथे मराठी विषयाच्या प्राध्यापक असून त्या कवयित्री व लेखिका देखील आहेत.
तसेच प्रियांका केदार के के वाघ महाविद्यालयात औषधनिर्माण शास्त्रात पदवीचे शिक्षण घेत आहेत.
त्यांच्या ह्या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: