Thursday , December 8 2022
Breaking News

कावी सांगवी परीसरात ढगफुटीच्या पावसाने शेतीची वसाहत.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- काजी सांगवी तालुका चांदवड येथे काल झालेल्या ढगफुटीच्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काजी सांगवी येथील संजय ठाकरे यांच्या भुईमुगाचे पीक पूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे याचा मोठा फटका त्यांना बसला आहे. त्यांच्या शेतात पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. काजी सांगवी येथे काल रात्री आठ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाऊस येणार अशी स्थिती असताना आकाशात प्रचंड ढग जमा झाले आणि क्षणात पाऊस सुरु झाला. तब्बल दीड तास झालेल्या पावसाने काझिसांगवी रेडगाव पाझर तलाव भरून गेला आहे. यातून काही क्षणातच साडवा बाहेर पडणार असल्याचे वृत्त आहे. रात्रीच्या सुमारास प्रचंड पावसामुळे काझिसांगवी परिसरातील अनेक वस्तुची नुकसान झाली आहे. अनेक शेताची वसाहत झाली असून अनेक शेतकऱ्यांनी मका सोयाबीनची पेरणी केली आहे. त्यामुळे या मुसळधार पावसात शेती पिकाला फटका बसला आहे. काजी सांगवी येथे अनेक शेतांमध्ये शेतीमधील बांध पावसाने वाहून नेले आहे.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: