Saturday , November 26 2022
Breaking News

सरकारी कामात अडथळा प्रकरणात दाम्पत्याला न्यायालयाचा दणका.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- आठ वर्षांपूर्वी गंगापूर रोड परिसरातील विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदानकेंद्रानजीक प्रतिबंधित क्षेत्रात वाहन नेण्यावरून दाम्पत्याने बंदोबस्तावरील पोलिसांशी हुज्जत घातली.तसेच, अंजने दाम्पत्याने पोलिसांशी हुज्जत घालत शिवीगाळ केली, तसेच कराटे चॅम्पियन असल्याचे म्हणत आरोपी रूपाली हिने सरीता जाधव यांना मारहाण केली. मारहाण केल्याप्रकरणी आरोपी दाम्पत्या विरुद्ध गंगापूर पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सदर घटना १५ ऑक्टोबर २०१४ ला घडली होती.

याप्रकरणी न्यायालयाने दांपत्यास चांगल्या वर्तणुकीचे वर्षभरासाठी बंधपत्र व प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. रूपाली दीपक अंजने, दीपक मंगलदास अंजने (दोन्ही रा. उदयनगर, गंगापूर रोड), अशी आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अॅड. योगेश कापसे यांनी कामकाज पाहिले. न्यायाधीश आर. आर. राठी यांनी दोघांना प्रत्येकी १० हजारांचा दंड आणि वर्षभरासाठी चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र देण्याचे आदेश बजावले आहेत

About किरण सोनवणे

Check Also

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे कालवश

…आणि त्यांनी चक्क खासदारांच्या कानशीलात लगावली मनिष शेलार (बागलाण) सटाणा सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक(३ नोव्हेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: