Thursday , December 8 2022
Breaking News

मासळी बाजारात वळगणीच्या मा‍शांची वाढली आवक

मनिष मसुरकर विशेष प्रतिनिधी ठाणे जिल्हा
सुराज्य न्युज
मो.नं. : ८८७९३७३१६४

ठाणे (शहापूर) : सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, पाऊस सुरु झाला की पहिल्या पावसात पर्वणी येथे ती वळगणीच्या माशांची. वळगणीचे हे मासे प्रामुख्याने पोटात अंडी असलेले असतात. पोटात अंडी असलेले मासे चविष्ट असतात. खवय्ये हे मासे मोठ्या चवीने खातात.

सध्या असे मासे मोठ्या प्रमाणात तीन दिवसापासून शहापूर मध्ये मासळी बाजारात उपलब्ध होत असल्याने खवय्यांना मेजवानी मिळत आहे. गोड्यापाण्यात (गोडी मच्छी) विक्रेत्यांचा धंदा देखील यामुळे तेजीत आला आहे.

या माशांची आवक देखील वाढली असून, त्यामध्ये मळे, शिवडा, अरलय, वाम, मळे, कोलंबी, मंगरुळ, शिंगटी, चिवण्या, खवल आदी माशांचा समावेश आहे

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: