Thursday , December 8 2022
Breaking News

भंडारा जिल्हा राईस मिल असोसिएशनच्या अध्यक्षपदी मा. सुनील फुंडे यांची निवड

भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा 8308726855,8799840838

भंडारा :- भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भंडारा जिल्हा राईस मिल असोसिएशनच्या अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. सुनील फुंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्ह्यातील भातगिरणी मिलर्स यांनी त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या निवडीला खासदार सुनील मेंढे यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या निवडीने डबघाईस आलेल्या जिल्ह्यातील राईस मिल उद्योगाला चालना देण्यासाठी उभरते नेतृत्व सुनिल फुंडे यांच्या रुपाने सुनील फुंडे यांचा सत्कार करताना खासदार सुनील मेंढे व नाना पंचबुधे लाभल्याचे मान्यवरांच्या वक्तव्यातून पुढे आले.
मंचावर माझी राज्यमंत्री नाना पंचबुधे, राईस मिलर्स संघटना माझी अध्यक्ष नरेन्द्र कावडे , उपाध्यक्ष इकबाल सिद्धीकी तसेच कार्यक्रमाला उपस्थित सुमारे २०० राईस मिलर्स संघटनेचे सदस्य हजर होते. भंडारा जिल्हा भाताचा कोठार म्हणून सर्वश्रृत आहे. मात्र हा कोठार शासनाच्या जुजबी धोरणाने एक ना अनेक कारणांनी संकटात सापडलेला आहे.
शेतकरी व मिलर्स दोघेही शासनाच्या धोरणाचे बळी ठरत आहे. त्यांच्या न्याय हक्कांना अजून पर्यंत तरी अपेक्षित न्याय मिळालेला नाही. हा अन्याय दुर करण्याकरीता उभरते नेतृत्व सहकार नेते जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे निश्चितच कार्यक्षम आहेत. अशा आशावाद संघटनेच्या वतीने आणि खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला आहे.

About किरण सोनवणे

Check Also

मुरमाडी/तूप येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे

माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांनी मागणी कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: