Thursday , December 8 2022
Breaking News

विवाहितेची विष घेवून आत्महत्या

लाखनी तालुुुक्यातील सेलोटी येथील घटना

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा

भंडारा:-लाखनी तालुक्यातील सेलोटी येथे विवाहितेने विष घेतल्याची घटना शुक्रवारी (ता. १) सायंकाळच्या सुमारास घडली. उपचारादम्यान तिचा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी (ता.२) ला मृत्यू झाला. रत्नमाला ज्ञानेश्वर निखाडे वय ३२ रा. सेलोटी असे मृत विवाहितेचे नाव आहे.
मृतक रत्नमाला ज्ञानेश्वर निखाडे ह्या आपले पती व मुलांसह सेलोटी येथे वास्तव्यास होते. मोलमजुरीचे काम आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. रत्नमाला यांनी सायंकाळच्या सुमारास विष प्राशन केले ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येतात कुटुंबीयांनी तिला लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून प्रकृती अत्यावस्त असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील शावागरात पाठविण्यात आले. शवविच्छेदणानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. मृतक रत्नमाला यांच्या पश्चात पती व दोन मुले आहेत. चिमुकल्यांची आई हरपल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

About किरण सोनवणे

Check Also

मुरमाडी/तूप येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे

माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांनी मागणी कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: