Thursday , December 8 2022
Breaking News

बाजार समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार

सरगम शाहारे अर्जुनी मोरगाव तालुका प्रतिनिधी जि.गोंदिया

अर्जुनी मोरगाव :- कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी – मोरगाव येथील कनिष्ठ लिपिक संजय बहेकार यांची मुलगी प्रांजली हिने इयत्ता १० वीमध्ये ९ ८.४० टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम व जिल्ह्यातून तिसरी आल्याबद्दल बाजार समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनी प्रांजलीचा सत्कार करण्यात आला .

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित सत्कार सभारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्य प्रशासक लोकपाल गहाणे होते . याप्रसंगी प्रमुख अतिथी प्रशासक गिरीष पालीवाल , उद्धव मेहेंदळे , बन्सीधर लंजे , सत्कारमूर्ती प्रांजली संजय बहेकार , सरिता बहेकार उपस्थित होते . बाजार समितीच्या एका कर्मचाऱ्याच्या मुलीने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याने बाजार समितीच्या वतीने प्रांजलीचा शल , श्रीफळ देऊन सत्कार करून पेढा भरवून कौतुक करण्यात आले . तसेच तिच्या आई वडिलांचा सुद्धा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे संचालन प्रभारी सचिव संजय सिंगनजुडे यांनी केले . तर आभार धम्मदीप मेश्राम यांनी मानले . कार्यक्रमासाठी भरत वाढई , दुधराम मेश्राम , मंगेश डोये , अशोक जुगादे , तारकेश्वर राऊत , योगेश मैंद यांनी सहकार्य केले .

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: