Thursday , December 8 2022
Breaking News

शिक्षक कधी निवृत्त होत नसतो.एका अवलिया शिक्षकाचा मागोवा.

संघरत्न उके कुही तालुका प्रतिनिधी जिल्हा नागपूर मो 9764421627

 मी… तुम्हाला सुरेश तीतरमारे सरांच्या सेवापूर्ती निमित्त त्यांच्या कार्याचा मागोवा देत आहे.शिक्षकी पेशा हा उत्तम पेशा आहे.परंतु,आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या मोहजालामुळे अनेक आव्हाने निर्माण झालेली आहेत. मुलांचे पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतील, तर शिक्षक हे मुलांचे दुसरे पालक आहेत. फुलाला सुगंध मातीचा, गाईला सुगंध वासराचा, गवयाला सुगंध गाण्याचा त्याचप्रमाणे शिक्षकांना सुगंध विद्यार्थ्यांचा. नीतिमूल्याने परिपूर्ण असे विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.
‘शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ शालेय अभ्यासक्रमाचे धडे न देता, मौलिक मूल्यांची, थोर विचारांची रुजवात करावी. त्यासाठी शिक्षकांनी अखंडित, चौफेर, विविधांगी वाचन करण्याची गरज आहे’,.
देव प्रत्येकाला कार्य करण्यासाठी पाचारण करतो. शिक्षकी पेशा हे देखील एक पाचारण आहे. शिक्षकी पेशा एक आव्हान आहे आणि ते आपण स्वीकारला हवे.
ज्या ज्या व्यक्तींनी शिक्षकी पेशा स्वीकारला त्या सर्वांनी जाणते व अजाणतेपणे विद्यार्थी विकास साधला.अनेक पिढ्या घडवल्या.अनेकांच्या आयुष्यात ज्ञानाचा सूर्य उगवला.अनेकांनी आयुष्यात उंच गरुडभरारी घेतली.वेगवेगळ्या नोकऱ्या करून विद्यार्थी पण सेवा देत आहेत.ज्यांच्या हातून अनेक कर्मचारी झालेत.अनेक व्यावसायिक झालेत.कुणी समाजसेवक झालेत तर कुणी कला क्षेत्रात भरारी घेतली. मुकुंदराज स्वामी माध्यमिक विद्यालय नवेगाव येथे कार्यरत असणारे,ज्यांचा इंग्रजी विषयात हातखंडा होता.त्यांनी शिकविलेला विद्यार्थी आजही अभिमानाने सांगतो की सुरेश तितरमारे सरांनी इंग्रजीची दिलेली  शिदोरी आजही आम्हाला उपयोगी पडते.यावरून या सरांनी केलेले कार्य  प्रामाणिक,विद्यार्थी हिताचे होते हीच प्रचिती येते.यावरून शिक्षक निवृत्त होत नाही कारण त्यांनी पेरलेले ज्ञान,विचार हे पिढ्यानपिढ्या पुढे चालूच असतात.शिक्षक हा या काळातील पुण्यवान असतो.तथागत गौतम बुद्धांनी पण त्यांच्या विचारात सांगितले आहे की  *“सब्बदानं धम्मदानं जिनाती.”* अर्थात सर्व दानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ आहे.संतांनी पण सांगीतले आहे की,
*“गुरूर्ब्रम्ह,गुरूर्विष्णू,गुरुर्देवो महेश्वरा,गुरूर्साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः”*
या गुरुजींना त्यांच्या सेवापुर्ती निमित्त अनंतकोटी शुभेच्छा.

About किरण सोनवणे

Check Also

सोशल मीडिया

सुराज्य न्युज या न्युज नेटवर्क मध्ये आपले स्वागत… जर आपल्याला whatsapp वर बातम्या हव्या असल्यास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: