Sunday , November 27 2022
Breaking News

गृहअर्थशास्त्र विभागातर्फे स्व.निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी तुपकर येथे कार्यक्रमाचे आयोजन

सुराज्य न्युज/ रुपाली मेश्राम

भंडारा :- लाखणी तालुक्यातील स्व. निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी तुपकर अंतर्गत असलेल्या गृहअर्थशास्त्र विभागातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थिनीकरिता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.प्रतिमा वंजारी जे. एम. पटेल कॉलेज भंडारा तर प्रमुख उपस्थितीमध्ये पोहरा ग्रामपंचायत सदस्या सौ.अर्चना किशोर गायधने हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गृहअर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. अर्चना निखाडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश व संकल्पना समजावून दिली तसेच राज्यातील युवक- युवतीकरिता प्रशिक्षणाद्वारे कौशल्य विकास करून स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान राबविण्यात येत आहे करिता त्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी आपल्या प्रास्ताविक संबोधनात केले. प्रमुख मार्गदर्शक व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रतिमा वंजारी यांनी कौशल्य विकास महाविद्यालयीन युवतींनी कसे,कुठे,केव्हा व कोणकोणत्या क्षेत्रात करायचे याबद्दल इत्यंभूत माहिती पुरविली तसेच गृहअर्थशास्त्र या विषयाअंतर्गत स्वयंरोजगार उभारून अर्थांजन कसे करावे यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले.
यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थीनीकरिता विविध स्पर्धांचे यामध्ये फुलांचे गालिचे व पुष्पगुच्छ तयार करणे,कृत्रिम फुले तयार करणे ,टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात येऊन त्याचे प्रदर्शन महाविद्यालयात भरविण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन वैष्णवी नागलवाडे तर आभार प्रदर्शन त्रिवेणी कठाणे हिने केले. या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थीनी योगिता गायधने,पूजा शिंदे,पूजा कठाणे, त्रिवेणी कठाने, माहेश्वरी कठाणे,वैष्णवी नागलवाडे,प्रियंका लांजेवार,रुपाली चचाने,पूजा पंधरे, अश्विनी लांजेवार,ज्ञानेश्वरी माहुरकर, अर्चना साठवणे, अंकिता किरपाण, आचल देशमुख, चांदणी मुनेश्वर यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला व आकर्षक सजावट उपलब्ध साधनाद्वारे केली त्याबद्दल प्रमुख अतिथी आणि कार्यक्रम आयोजकांनी त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रम आयोजना करिता प्रभारी प्राचार्य ढवळे, प्रा.विश्वास खोब्रागडे, प्रा.विशाल गजभिये यांच्यासमवेत प्रा.डॉ. श्रीकांत भुसारी,प्रा.डॉ. राहुल चुटे,प्रा.मच्छिन्द्र फुलझेले,
प्रा.स्नेहा श्यामकुवर ,गीतेश्वरी तरोणे,अमर जांभुळकर,किशोरी ननोरे तसेच इतर प्राध्यापक- कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले

About जगन जाधव

Check Also

मुरमाडी/तूप येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे

माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांनी मागणी कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: