Sunday , November 27 2022
Breaking News

नाईकवाडीच्या विद्यार्थ्याचे राष्ट्रीय पातळीवर यश.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- मोहाली येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फार्मासिटीकल एज्युकेशन अँड रिसर्च यांच्याकडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील पदवीत्तर परिक्षेत येथील डॉ. नाईकवाडी महाविद्यालयाच्या शुशांत कदमने घवघवीत यश मिळवले. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फार्मास्युटिकल ही औषधनिर्माण शास्त्रमध्ये प्रतिष्ठेची समजली जाणारी संस्था असून त्यांच्याकडुन नुकतीच पदवीत्तर शिक्षणासाठी परीक्षा घेतली. या देशपातळीवरील परीक्षेत सुशांतने देशात 183 वा क्रमांक पटकावला. तसेच सुशांतने जी-पॅट या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेतही अव्वल क्रमांक पटकावला आहे. यामुळे प्राचार्य प्रा. एस. एस. डेंगळे, डॉ. आर. डी. नाईकवाडी, वैशाली नाईकवाडी, कृष्णा नाईकवाडी, एम. आर. पाटील यांनी सुशांतचे कौतुक करत त्याचा सत्कार केला. यासाठी त्याला प्रा. ए. एस. नाईकवाडी, प्रा. एन. ए. नरोडे, प्रा. रिनल पानगव्हाणे, प्रा. ज्योती खापरे, प्रा. शीतल गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.

About किरण सोनवणे

Check Also

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे कालवश

…आणि त्यांनी चक्क खासदारांच्या कानशीलात लगावली मनिष शेलार (बागलाण) सटाणा सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक(३ नोव्हेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: