Thursday , December 8 2022
Breaking News

रोजगार हमी कामाच्या प्रतीक्षेत गावकरी.रोजगार सेवीकेची अवैध पद्धतीने नियुक्ती.

संघरत्न उके कुही तालुका प्रतिनिधी जिल्हा नागपूर मो 9764421627

कुही:– तालुक्यातील म्हसली गट ग्राम पंचायत अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम म्हसली गावातील वॉर्ड क्र.1 येथील लोकांना द्यावे. असे मत गावातील अनेक पुनर्वसित बेरोजगारांना रोजगार मिळावा.त्यासाठी गरजवंत स्त्रिया,पुरुष आज दिनांक 29 जुन 2022 ला दुपारी 3 वाजता पंचायत समिती कुही कार्यालयात जावुन लेखी तक्रार दाखल केली आहे.व नरेगा मार्फत काम द्यावे.असे सर्व म्हसली गावातील ग्रामस्थांची मागणी केली आहे.म्हसली,धामनी, ब्रामनी, गोंडपिपरी गांवात काम चालू होते,परंतु म्हसली गावातील नरेगाच्या कामावरचे झाडे वाळून गेली.त्यामुळे ते काम बंद पाडले आहे,पण खरे सांगायचे झाले तर म्हसली गावातील मागील मार्च महिन्यापासून पाण्याची अत्यंत कमतरता होती. त्यामुळे ति झाडे सुकून वाळली.व म्हसली येथील निवासी नागरिकांसाठी पाण्याची सोय योग्य वेळी केली असती तर आता ही वेळ आली नसती. यांत म्हसली गावातील संबंधित संरपंचा तथा सर्व ग्रामपंचायत प्रशासन विभाग,रोजगार सेविका शालु अतकरी दोषी आहे.योग्य पध्दतीने निर्णय(नियोजन) घेण्यात येत नाही.त्यामुळे ती झाडे वाळली.झाडांना खत,पाणी पोहोचले नाहीत,तेव्हा म्हसली गावातील अनेक महिलांनी याबाबत तक्रारीत नमूद केले की लागलेल्या सर्व झाडाचा खर्च रोजगार सेविका कडुन घेण्यात यावे. व ही रोजगार सेविका दोन ग्राम पंचायती मध्ये रोजगार सेविका कशी काय असू शकते? असा प्रश्न उपस्थित केला.उमरी,नवेगाव,सोनारवाही यांची नवेगाव ग्राम पंचायत व म्हसली ग्राम पंचायती मध्ये एकाच व्यक्तीला दोन्हीगावात संधी कशी काय? असे प्रतिपादन नागरिकांनी उपस्थित अधिकारी यांना निवेदन देताना केले आहे.आणि म्हसली गावातील ग्रामस्थांची व्यथा पाहुन त्यांना 100 दिवस नियमानुसार काम द्यावे. व दोषी असलेल्या व्यक्तीवर कारवाई करावी.अशी मागणी प्रदीप मेश्राम,मिराबाई तिरसागरे,ललीता राऊत, चंद्रकला कुंभारे,मंदा मेश्राम, इंदुबाई सोनबावने,वर्षा तांदूळकर अनिता मेश्राम,शिलाबाई उके यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: