Thursday , December 8 2022
Breaking News

शहर पोलिसांच्या हद्दीत दोन अनोळखी मृतदेह.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दोन अनोळखी मृतदेह आढळून आले आहेत. या मृतदेहांची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शहरातील जुना बस स्थानक परिसरात एका पस्तीस वर्षीय वयोगटातील इसामाचा मृतदेह आढळून आला. सदर इसमाचा रंग गोरा, कपाळावर जुनी जखमीची खुण, अंगात मळकट सफेद फुल बाहीचा शर्ट, गडद पिवळ्या रंगाची मळकट पॅन्ट, बनीयन, अशा वर्णनाचा सदर मृतदेह आहे. यासंदर्भात माहिती असणाऱ्यांनी मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे तपाशी अंमलदार पो. उ. नि. अनिल पठारे यांच्याशी ८४२२९४९८०४ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

तसेच शहरातील शिवतीर्थावरील शिवाजी पुतळ्या समोर बेशुध्दावस्थेत सापडलेल्या ६५ वर्षीय अनोळखी वृद्धाचा सामान्य रुग्णालयात मृत्यु झाला. सडपातळ, सावळारंग, डोकयावर पांढऱ्या रंगाचे विरळ बारीक केस अंगात पांढऱ्या रंगाचा मळकट फुल बाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट असे या मृतदेहाचे वर्णन आहे. यासंदर्भात माहिती असणाऱ्यांनी शहर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिती सावंजी यांच्याशी संपर्क साधावा.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: