Thursday , December 8 2022
Breaking News

कणकोरी च्या माजी सरपंचाच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांसाठी आगळेवेगळे नियोजन.

श्री. सुरेश सांगळे. जिल्हा प्रतिनिधी नाशिक ग्रामीण मो. 7030232020.

नाशिक-सिन्नर तालुक्यातील कणकोरी गावचे माजी सरपंच तसेच सिन्नर वार्ड क्रमांक 10 चे भावी नगरसेवक ,श्री. निलेशजी जगताप यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. परंतु या वर्षी त्यांनी आगळेवेगळे नियोजन केले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे संपुर्ण देशात आर्थिक संकट आले आहे. आपल्यातली काही जवळची मानसे आपल्या ला सोडून गेली. अशातच काही मुले अनाथ झाले. अशा सर्व सोडून गेलेल्यानां या वर्षी चा वाढदिवस निलेशजी जगताप यांच्याकडून समर्पित आहे.

निलेश जी जगताप यांनी चाहत्यांना असे आव्हान केले आहे की,आपण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी 29 जुन रोजी ,शाल,गुच्छ, बुके या क्षणीक वस्तू न देता सदैव आठवणीत राहतील असे शैक्षणिक वस्तू, वही, पेन, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना देण्याकरीता आपणा कडून भेट स्वरुपात स्विकार करताना खुपच आनंद वाटेल. असे आवाहन केले आहे.

शैक्षणिक साहित्य स्विकारण्याचा पत्ता.

श्री. निलेश उत्तमराव जगताप. *निवासस्थान* – *रामायण*. वार्ड  क्रमांक-10. वृंदावन नगर, सिन्नर. मो. *9970005002* .

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: