Saturday , December 3 2022
Breaking News

महामार्ग पोलिसांचे वाहन चालकांना प्रबोधन

अपघात टाळण्यासाठी सांगितल्या उपाययोजना

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले यांचा पुढाकार

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा

भंडारा :- पावसाळ्यात अपघाताचे प्रमाणात वाढ होत असते अपघात टाळण्यासाठी उपाययोजना बाबद वाहन चालकांना मार्गदर्शन व त्यामुळे वाहतुकीचे नियम संबंधाने नुकतेच महामार्ग पोलीस मदत केंद्र गडेगाव(लाखनी) हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर महामार्ग पोलीस मदत केंद्रासमोर दुचाकी वाहन चालकांना थांबवून सध्या सुरु असलेल्या पावसाळा ऋतु दरम्यान वाहन चालविताना विविध प्रकारच्या खबरदारी घेण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.
पावसाळ्यात वाहन चालविण्यास घेण्यापूर्वी वाहन हे तांत्रीक दृष्ट्या चांगले आहे का हे पाहूनच वाहन चालवावे. जोरात पाऊस सुरु असतांना शक्यतो सुरक्षित स्थळी थांबावे. विजांचा कडकडाट होत असतांना झाडाखाली थांबू नये. नेहमी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहन चालविताना नेहमी हेल्मेट चा वापर करावा,मोटार सायकल चालवितांना मोबाईल फोनचा वापर टाळावा, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, सुरक्षित अंतर ठेवून वाहन चालवावे, समोरील रोड क्लियर असल्याबाबत खात्री करूनच ओव्हरटेक करावे, वळणावर ओव्हरटेक करू नये, वेग मर्यादाचे पालन करावे, विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये, अपघात समयी जखमींना मदत करावे, महामार्गावर अपघात झाल्यास १०३३ या टोल फ्री कमांकावर संपर्क कराव. इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच पावसाळ्यात वाहनचालकां करीता मार्गदर्शन व वाहतुकीचे नियम संबंधाने विविध ठिकानी कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
यावेळी गडेगाव महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले, पोलिस उपनिरीक्षक नितीन आगासे, सावरकर, पोलिस हवालदार कृष्णा भुते, पोलिस नायक नामदेव नखाते, हुकूमचंद आगासे, उमेश टेंभुर्णीकर, प्रकाश तांडेकर इत्यादी पोलिस कर्मचाऱ्यांसह वाहन चालक प्रामुख्याने उपस्थित होते.

About किरण सोनवणे

Check Also

मुरमाडी/तूप येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे

माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांनी मागणी कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: