Thursday , December 8 2022
Breaking News

बागलाण मध्ये दक्षता सेवा फाऊंडेशनची स्थापना

निखिल लांडगे सुराज्य न्युज महाराष्ट्र

   बागलाण (६ नोव्हेंबर २०२२)-  बागलाण तालुक्यात दक्षता फाऊंडेशन ची स्थापना करून पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला.याप्रसंगी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संजय भावसार तसेच सचिव सौ.किरण देशपांडे उपस्थित होते.मा.भावसार यांनी आपल्या भाषणात पोलिसांना फाऊंडेशन कडून कशी मदत केली जाईल त्यांना मदत करण्याची गरज काय याविषयावर माहिती दिली.तसेच महाराष्ट्रात सर्व प्रथम बागलाण तालुक्यात ह्या फाऊंडेशन ची सुरूवात झाली.ही भाग्याची गोष्ट आहे हे आवर्जून सांगितले तसेच सचिव सौ.देशपांडे मॅडमांनी काम कसे करावे पोलिसांना कशी मदत करावी याविषयी माहिती सांगून पूर्ण दक्षता टिमला पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बागलाण तालुक्याचे दक्षता सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री.आबा अहिरे (सर)यानी आपले मनोगत व्यक्त केले.आणि एक चांगले काम करू असे आश्वासन दिले.तसेच महिला अध्यक्ष श्रीमती.ज्योती भामरे यांनी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर सर्व सन्मानीय सभासदांना मा.भावसार सर व देशपांडे मॅडम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र  , आयकार्ड देण्यात आले.दक्षता सेवा फाऊंडेशन चे पदे पुढीलप्रमाणे –
पुरूष-
आबा अहिरे (अध्यक्ष),नितीन निकम (उपाध्यक्ष),समाधान अहिरे(सचिव),अरूण पाटील (खजिनदार),योगेश पगार(संघटक),केवळ अहिरे(संपर्कप्रमुख),सागर निकम (प्रसिद्धीप्रमुख),
महिला-ज्योती भामरे(अध्यक्ष),दिपाली देवरे(उपाध्यक्ष),सुवर्णा पवार (सचिव),रुपाली पगार (खजिनदार),उज्वला पगार (संघटक),कल्पना खैरनार (संपर्कप्रमुख),वैशाली अहिरे (प्रसिद्धीप्रमुख),अशी पदे देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.ए.एस.पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सुवर्णा पवार मॅडम यांनी केले.याप्रसंगी कुणाल ठाकरे सर, रणधीर भामरे (पञकार),तसेच स्वप्निल वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

सोमपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न

मनीष शेलार प्रतिनिधी बागलाण(सटाणा)सुराज्य न्युज महाराष्ट्र सोमपूर-( ०१ डिसेबंर २०२२): येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: