Thursday , December 8 2022
Breaking News

नागपूर येथील सराईत गुन्हेगार संतोष सुरेश राजपूत भंडाऱ्यात जेरबंद

भंडारा पोलीस तथा गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाले यश

भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा 8308726855,8799840838

भंडारा :- नागपूर येथील सराईत गुन्हेगार तसेच घरफोडीच्या विविध घटनांना अंजाम देणाऱ्याचे एका ३७ वर्षीय गुन्हेगाराला जेरबंद करण्यात भंडारा पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. संतोष सुरेश राजपूत, रा. प्रताप नगर, नागपूर असे जेरबंद केलेल्या अशा अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. ही कारवाई भंडारा पोलीस तथा गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या कारवाईने भंडारासह नागपूर जिल्ह्यातील विविध घटनांचा उलगडा होण्यास मदत मिळणार आहे.
माहितीनुसार, गत तीन दिवसांपूर्वी भंडारा येथील मोठा बाजार परिसरात व्यावसायिक दुकानांचे शटर तोडून चोरी होण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. या संदर्भातल्या तक्रारी भंडारा पोलीस ठाण्यातही देण्यात आल्या होत्या.
वारंवार होत असलेल्या घटनांमुळे बाजार परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेला अंजाम देणारा गुन्हेगार हा सराईत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भंडारा पोलिसांनी त्या दिशेने कारवाईसाठी तात्काळ पाऊल टाकले.
पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात भंडाऱ्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने अतिशय गोपनीय पद्धतीने खबऱ्यांच्या संपर्कात राहून या अट्टल गुन्हेगाराचा शोध लावला.
बसस्थानक परिसरात वावरत असताना संतोष राजपूत याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्या बॅगमध्ये घरफोडी करण्याचे साहित्य तसेच दहा हजार ६८० रुपयांची रक्कमही हस्तगत करण्यात आली. रकमेबाबत विचारणा केली असता भंडारा शहरात २९ जून ते १ जुलैच्या दरम्यान मोठा बाजार परिसरात केलेल्या घरफोडीच्या घटनेतील पैसे असल्याचे त्याने कबूल केले.
साकोली येथे १५ ते २० दिवसांपूर्वी दुकान फोडण्याची कबुलीही त्याने दिली. या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, एचडीपीओ संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात तसेच पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक निखिल रहाटे,  फौजदार पुरुषोत्तम शेंडे, पोलीस हवालदार बाळाराम वरखडे, मोजीलाल शहारे, प्रशांत भोंगाळे, साजन वाघमारे, पोलीस शिपाई नरेंद्र झलके, हिरा लांडगे यांनी कामगिरी केली.
चाेरी, घरफाेडीसह २० पेक्षा जास्त गुन्हे पकडण्यात आलेल्या संतोष राजपूत याच्यावर नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये  २० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. चोरी घरफोडीसह अन्य सदराखाली ही गुन्हे आहेत. भंडारा, साकोली व नागपूर येथे घडलेल्या घटनांमागे संतोषचा काय सहभाग आहे, याचाही तपास पोलीस करीत आहेत.

About किरण सोनवणे

Check Also

मुरमाडी/तूप येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे

माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांनी मागणी कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: